जळगाव : शहरात धावत आहेत कालबाह्य झालेल्या 40 टक्के बसेस

जिल्ह्यामध्ये 720 बसेसपैकी 224 लांब पल्ल्यासाठी चालवली जाताहेत
St Accident In Guhagar
एसटी बसPudhari File Photo
Published on
Updated on

जळगाव : शहरात चालवण्यात येत असलेल्या राज्य परिवहन विभागातील बसेसची वयोमर्यादा 12 ते 15 वर्षे झाली असली तरीही यामध्ये जळगाव जिल्ह्यातील विविध विभागामध्ये 720 वाहनांपैकी 224 वाहने ही लांब पल्ल्यासाठी चालवली जात असल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे. जिल्ह्यामधील असलेल्या बसेस पैकी बारा वर्ष ते पंधरा वर्षे या कालावधीमध्ये 40 टक्के बसेस आहेत. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात नवीन बसेसची मागणी केली जात आहे. इलेक्ट्रॉनिक बसेसची देखील मागणी करण्यात आली असून 5 ठिकाणी चार्जिंग सेंटर उभारण्याचे काम सुरू आहे.

एसटी महामंडळ ही ग्रामीण भागाची प्रमुख गरज आहे. तालुक्याच्या ठिकाणाहून ग्रामीण भागासाठी नागरिकांना ये जा करण्यासाठी सोईचे वाहन म्हणजे एसटी महामंडळाची बस होय. जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागापर्यंत ही बस वाहतूक सुरू आहे. जळगाव जिल्ह्यातील विभागांमध्ये 720 बसेस सध्या कार्यान्वित आहेत. यामधील 224 बसेस या नियमित लांब पल्ल्यासाठी नियमित सुरु आहेत.

जळगाव जिल्ह्यातील 720 बस मधील 40 टक्के वाहनेही बारा वर्ष किंवा पंधरा वर्षे पूर्ण झालेली असल्याने भविष्यात ही वाहने निकामी किंवा कालबाह्य ठरण्याचा संभाव्य शक्यता आहे. परिणामी जळगाव जिल्ह्यात ग्रामीण भागात बस चालवणे जिकरीचे होईल, याकरीता शासनाकडे बसेसची मागणी करण्यात आलेली आहे तसेच इलेक्ट्रॉनिक बसेसची सुद्धा मागणी करण्यात आलेली आहे.

यासाठी मुक्ताईनगर, पाचोरा, जळगाव, चोपडा, चाळीसगाव या पाच ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम सुरू आहेत. जळगाव व चाळीसगाव या ठिकाणी बस स्थानकाचे काम प्रस्तावित असल्याने या ठिकाणी काम मागे पडलेले आहे.

शहरात पाच ठिकाणी चार्जिंग स्टेशनचे काम सुरू आहे, त्यापैकी दोन ठिकाणी कर्तव्याबाबत तत्त्वाचा प्रश्न असल्याने काम मागे पडले आहे. तर 40 टक्के वाहने ही 12 ते 15 वर्ष कालावधी पूर्ण झालेली आहेत.

भगवान जगनोर, विभाग नियंत्रक, जळगाव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news