जळगाव : गांधीधाम एक्सप्रेसमधून 40 किलो गांजा जप्त

जळगाव : गांधीधाम एक्सप्रेसमधून 40 किलो गांजा जप्त
 इलेक्ट्रॉनिक वजनकाटा
गांजा जप्तfile photo
Published on
Updated on

जळगाव : रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी नेहमीप्रमाणे रेल्वे बोगी मध्ये तपासणी करीत असताना रेल्वे सुरक्षा बलाच्या श्वान पथकाला गांधीधाम एक्सप्रेस मधील एका जनरल डब्यात एका बेवारस बॅग मधून 40 हजार रुपये किमतीचा गांजा मिळून आला आहे. या प्रकरणी रेल्वे पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ रेल्वे सुरक्षा बल पथकातील पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र इंगळे व दीपक पाटील हे श्वान पथकासोबत नेहमीप्रमाणे प्रत्येक रेल्वे बोगीत तपासणी करीत होते. तपासणी सुरू असतांना गांधीधाम एक्सप्रेसमधील जनरल डब्यात एक बेवारस बॅग मिळून आली. या बॅगेची तपासणी केली असता त्या बॅगेत अंदाजे ४० हजार रूपये किंमतीचा गांजा मिळून आला. भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने ही बॅग ताब्यात घेतली. याप्रकरणी भुसावळ रेल्वे पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news