

जळगाव | 'बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानाच्या वतीने ३, ४, ५ जानेवारी २०२५ रोजी करण्यात येणार आहे. हा महोत्सव छत्रपती संभाजीराजे नाट्य मंदिरात संध्याकाळी ७ ते ११ या वेळेत संपन्न होणार आहे.
अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये दिली. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विवेकानंद कुलकर्णी, उपाध्यक्ष दीपिका चांदोरकर, विश्वस्त शरदचंद्र छापेकर, डॉ. अपर्णा भट दीपक चांदोरकर, अरविंद देशपांडे जैन इरिगेशनचे अनिल जोशी उपस्थित होते.
स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून साजरा होणाऱ्या या २३ व्या महोत्सवाचे मुख्य प्रायोजक म्हणून जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., जळगाव जनता सहकारी बँक, व संस्कृती मंत्रालय, भारत सरकार याच्या वतीने महोत्सवाची सुरवात ३ जानेवारी रोजी होणार असून उदघाटन समारंभा नंतर प्रथम सत्रात बेंगलोर येथील प्रतिथयश भगिनी रेश्मा भट व रमैया भट यांच्या शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनाने होणार आहे. त्यांना संवादिनीवर अभिनव रवदे तर तबल्यावर रामकृष्ण करंबेळकर साथसंगत करतील. द्वितीय सत्र जुगलबंदीने सादर होणार आहे. यामध्ये कोलकाता येथील भाऊ व बहीण बासरी व गायनाची जुगलबंदी सादर करतील केवळ १५ वर्षांचा अनिरबन रॉय व त्याची बहिण मैत्रेयी रॉय यांच्यात आहे.
महोत्सवाचे द्वितीय दिनाचे प्रथम सत्र बेंगलोरचाच गायक अनिरुध्द ऐटल सादर करणार आहे. ते शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन सादर करतील त्यांना संवादिनीवर अभिनव रवंदे तर तबल्यावर रामकृष्ण करंबेळकर साथसंगत करतील द्वितीय दिनाचे द्वितीय सत्र दिल्ली येथील प्रख्यात नृत्यांगना, अभिनेत्री, व पं बिरजू महाराजांची नात शिंजीनी कुलकर्णी कथक नृत्य सादर करतील त्यांना तबल्याची साथ योगेश गंगाणी, संवादिनी गायन साथ सामी उल्हाह खान, पढतची साथ अश्विनी सोनी, तसेच सतार ची साथ पंडिता प्राजक्ता गुर्जर करतील
तृतीय दिनाचे प्रथम सत्र 'तबला क्वीन' या उपादीने सन्मानित झालेल्या कोलकत्याची तरूण तबला वादक रींपा शिव आपल्या एकल तबला वादनाने रसिकांना मंत्रमुग्ध करतील रीपा यांना संवादिनीवर नगम्याची साथ अभिषेक रवंदे करतील.
समारोपाच्या सत्रात तरुण पिढिचे प्रतिनिधित्व करून भारतीय अभिजात संगीताची धुरा पुढे नेणारे पती पत्नी ज्याच्या घराण्यातच अभिजात संगीताचे संस्कार होत आलेले आहेत जे देश विदेशात आपली कला सादर करून रसिकांना रीझवित आहेत असे नंदिनी शंकर (व्हायोलिन) व महेश राघवन (जिओ श्रेड) या वाद्यावर जुगलबंदी सादर करणार आहेत. त्यांना तबल्याची साथ प्रख्यात तबला वादक तनय रेगे करणार आहेत.
२३ व्या बालगंधर्व संगीत महोत्सवाची यावर्षीची tसुसंवादिनी असणार आहे w झी मराठी वरील 'महाराष्ट्राची सुपरस्टार' फावनालिस्ट व युवक महोत्सवातील सुवर्ण पदक विजेती जुई भागवत,
तरुण पिढीने व जुन्या पिढीने सुद्धा ऐकावा असा हा स्वरोत्सव असून तमाम जळगावकर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती देऊन वा बालगंधर्व संगीत महोत्सवाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन स्व वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान व या महोत्सवाच्या विविध प्रायोजकांनी केले आहे. कार्यक्रम वेळेवर सुरू होईल, तरी रसिकांनी वेळेवर उपस्थित रहावे ही विनंती.