Jalgaon Railway news | जबलपूर पुणे विशेष गाडी झाली नियमित : भुसावळ, मनमाडसह महत्त्वाच्या स्थानकांवर मिळणार थांबा!

नव्या क्रमांकासह २४ मेपासून गाडी रुळावर!,पुणे-जळगाव-जबलपूर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा
Jalgaon Railway news
Jalgaon Railway news
Published on
Updated on

जळगावः प्रवाशांची वाढती गर्दी आणि 'वेटिंग लिस्ट'चा कायमचा घोळ संपवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने जबलपूर आणि पुणे दरम्यान धावणारी विशेष रेल्वे आता केवळ 'स्पेशल' न राहता कायमस्वरूपी नियमित एक्सप्रेस म्हणून धावणार आहे! २- द्वितीय वातानुकूलित डब्यांसह ही गाडी नव्या क्रमांकासह प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे. विशेष म्हणजे खान्देशातील प्रवाशांसाठी अत्यंत सोयीच्या असलेल्या भुसावळ आणि मनमाड स्थानकांवर या गाडीला थांबा देण्यात आल्याने जळगाव जिल्ह्यातील हजारो प्रवाशांचा पुणे आणि जबलपूर प्रवास आता अधिक सुकर आणि हक्काचा होणार आहे.

सध्या सुरू असलेली गाडी क्रमांक ०२१३२/०२१३१ जबलपूर - पुणे विशेष गाडीचे रूपांतर आता नियमित गाड्यांमध्ये करण्यात आले असून, त्याचे नवीन वेळापत्रक आणि क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या गाड्या नव्या क्रमांकासह खालीलप्रमाणे धावतील:

गाडी क्रमांक २०१६२ (जबलपूर - पुणे साप्ताहिक एक्सप्रेस)प्रत्येक रविवारी दि. २४.०५.२०२६ पासून जबलपूर येथून दुपारी १३:५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०६:२५ वाजता पुणे येथे पोहोचेल.

गाडी क्रमांक २०१६१ (पुणे - जबलपूर साप्ताहिक एक्सप्रेस)प्रत्येक सोमवारी दि. २५.०५.२०२६ पासून पुणे येथून सकाळी ११:२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०६:०० वाजता जबलपूर येथे पोहोचेल.

खान्देश आणि मध्य महाराष्ट्रातील प्रवाशांना थेट कनेक्टिव्हिटी मिळावी यादृष्टीने या गाडीचे थांबे मदन महल, नरसिंगपूर, पिपरिया, इटारसी, हरदा, बुरहानपूर, भुसावळ, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर आणि दौंड कॉर्ड लाईन देण्यात आले आहेत.

भुसावळ आणि मनमाड हे मध्य रेल्वेवरील महत्त्वाचे जंक्शन्स असल्याने जळगाव जिल्ह्यातील नोकरदार, विद्यार्थी आणि व्यावसायिकांना पुण्यासाठी थेट आणि हक्काची एक्सप्रेस सेवा मिळणार आहे.

प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी या गाडीत सर्व प्रकारच्या श्रेणींचे डबे जोडण्यात आले आहेत:

२ वातानुकूलित द्वितीय श्रेणी (2AC)

३ वातानुकूलित तृतीय श्रेणी (3AC)

६ शयनयान श्रेणी (Sleeper Class)

४ सामान्य द्वितीय श्रेणी (General Class)

२ सामान व गार्ड ब्रेक व्हॅन

एकंदरीत, रेल्वेच्या या निर्णयामुळे ऐन उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपताना आणि नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना पुणे-जळगाव-जबलपूर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news