Devendra Fadnavis | नेपाळ दुर्घटनेतील जखमींची फडणवीसांकडून विचारपूस

नेपाळ दुर्घटनेतील जखमींची फडणवीसांकडून विचारपूस
Devendra Fadnavis,Deputy Chief Minister of Maharashtra
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रुग्णालयात जखमींशी विचारपूस केली. pudhari news network
Published on
Updated on

जळगाव : नेपाळमधील पोखरा-काठमांडू दरम्यान नदीपात्रात बस कोसळून अपघातात जखमी झालेल्या जळगाव जिल्ह्यातील सात रुग्ण मुंबईत दाखल झाले असून त्यांच्यावर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis,Deputy Chief Minister of Maharashtra) यांनी मंगळवारी (दि. २७) दुपारी रुग्णालयात जात जखमींशी विचारपूस केली. जखमी प्रवाशांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा व्हावी, अशा सदिच्छा त्यांनी यावेळी दिल्या.

Summary

उप मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (दि.27) रोजी दुपारी या जखमींची बॉम्बे हॉस्पिटल येथे जाऊन विचारपूस केली. दुर्दैवी बस अपघातातील 7 जखमींना बॉम्बे हॉस्पीटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर हे देखील यावेळी सोबत होते. सात जखमींपैकी तिघांवर बुधवार (दि.28) रोजी शस्त्रक्रिया केली जाणार आहे. तर चार जखमींना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहेत. या सर्व जखमींना सर्वतोपरी मदत करण्यात येत असून, उपमुख्यमंत्री कार्यालय (विधि) अंतर्गत कार्यरत असलेल्या वैद्यकीय सहायता कक्षामार्फत यासाठी संपूर्ण समन्वय ठेवला जात आहे

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वैद्यकीय मदत कक्ष तसेच ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या मदतीने नेपाळ येथून विमानाने जखमींना मुंबईत आणण्यात आले. यामध्ये भुसावळ तालुक्यातल्या वरणगाव येथील एकूण सात जखमींचा समावेश आहे.

उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर उपस्थित होते. या 7 जखमींपैकी तिघांवर उद्या शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. आज (दि. २८) आणखी 4 जखमींना मुंबईत आणण्यात येणार असून, त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहेत. 23 ऑगस्टला नेपाळमधील मर्स्यांगदी नदीत महाराष्ट्रातील प्रवाशांची बस कोसळली होती. या घटनेत 27 जणांचा मृत्यू झाले असून 16 जखमी झाले होते. त्यापैकी बहुतांश प्रवासी जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातल्या वरणगाव, तळवेल परिसरातील आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news