

जळगाव : अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या हस्ते जळगाव येथील कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्यास अनेक मान्यवर उपस्थित होते. अल्पसंख्याक समाजाच्या आर्थिक विकासासाठी विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी हे कार्यालय कार्यरत राहणार आहे.
यावेळी ललित गांधी यांनी महामंडळाच्या विविध योजनांची माहिती देत, अल्पसंख्याक समाजातील उद्योजक व व्यवसायिकांसाठी हे कार्यालय मदतगार ठरेल, असे सांगितले. तसेच, लाभार्थ्यांनी महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाला स्थानिक प्रशासकीय अधिकारी, समाजसेवक आणि नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. अल्पसंख्याक समाजाच्या आर्थिक प्रगतीस चालना देण्यासाठी हे कार्यालय महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.