पती-पत्‍नीचा वाद, एसपी कार्यालयात नातेवाईकांची फ्री स्टाईल हाणामारी

दोन्ही कुटुंबांची परस्‍परांवरांविरूद्ध तक्रार
Husband-wife dispute, relatives freestyle fight in SP office
पती-पत्‍नीचा वाद, एसपी कार्यालयात नातेवाईकांची फ्री स्टाईल हाणामारीFile Photo
Published on
Updated on

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

दोन वर्षांपूर्वी लग्न झाल्यानंतर पती-पत्नीमध्ये वादविवाद होऊ लागले. ते सोडवण्यासाठी महिला दक्षता कक्ष या ठिकाणी आज पहिल्‍याच तारखेला पती-पत्नी व नातेवाईक आल्यानंतर जिल्हा पोलीस कार्यालयातच नातेवाईकांमध्ये हाणामारी झाली. यामुळे पोलीस यंत्रणा हादरून गेली. शेवटी दोन्ही कडील मंडळी परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी जिल्हा पोलीस स्टेशनमध्ये आले.

सूत्रांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, जळगाव शहरातील डी मार्ट येथे एक विवाहिता राहत असून तिचा विवाह चाळीसगाव येथील एका व्यक्तीशी दोन वर्षांपूर्वी झाला होता. पती-पत्नीमध्ये दोन वर्षांमध्ये वाद-विवाद होऊ लागल्याने हा वाद विकोपाला गेला. त्‍यांच्यात समझोता घडवण्यासाठी त्‍यांना महिला दक्षता या ठिकाणी अर्ज करण्यात आलेला होता.

आज पहिल्याच तारखेला दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास दोन्ही कडील मंडळी समोरासमोर आल्यानंतर एकमेकांना शिवीगाळ व मानहानी पर्यंत मजल गेली. यामुळे काही काळ वातावरण तंग झाले होते. एकमेकांवर हल्ले होऊ लागल्याने पळापळ झाली. शेवटी पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर मुलाकडील व मुलीकडील मंडळी बाहेर जाऊन थेट जिल्हा पेठ पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली. जिल्हा पोलीस स्टेशनशी संपर्क साधला असता पती-पत्‍नी कडील मंडळी पोलीस स्टेशनला आलेली असून परस्परांविरुद्ध तक्रार दिली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news