

जळगाव, नरेन्द्र पाटील
जिल्ह्यामधील हातनुर धरण हे सर्वात महत्त्वाचे धरण आहे. या धरणाच्या 41 दरवाजा व्यतिरिक्त नवीन 8 दरवाजे निर्मितीचे काम गेल्या 24 वर्षांपासून सुरू आहे. मात्र ते आजपर्यंत 60 टक्केच पूर्ण झालेले आहे. 43 कोटी रुपये खर्चही झालेला आहे. ज्या उद्देशाने या आठ दरवाजांची निर्मिती होते आहे ते अजूनही पूर्ण होताना दिसत नाहीये.
जळगाव जिल्ह्यातील हातनुर धरण हे सर्वात महत्त्वाचे आहे. सिंचन बिगर सिंचन पाणीपुरवठा औद्योगिक या सर्व दृष्टीने हातनुर धरण हे महत्त्वाचे धरण आहे. मात्र या धरणाच्या निर्मिती नंतर या धरणात साचलेला गाळ यामुळे भविष्यात धरण या गाळाने पूर्णपणे भरून जाऊ नये म्हणून आठ दरवाजांची दीड मीटर खोलीने निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता.
यासाठी 2000 मध्ये हातनुर धरणाच्या या आठ दरवाजांना मंजुरी देण्यात आली होती. पूर्वीचे असलेले 41 दरवाजे व त्यानंतर आठ दरवाजे असे 49 दरवाजे होणार होते.
हे दरवाजे 41 दरवाजांच्या दीड मीटर खाली असणार आहे. यामुळे पूर्णा नदी मधून येणारा गाळ वाहून जाण्यासाठी सर्वात महत्त्वाची मदत होणार होती. यामुळे धरणामध्ये गाळाचे प्रमाण कमी होणार होते.
मात्र 2001 मध्ये या कामांना निविदा व 47.57 कोटीची निधीची मंजुरी मिळालेली होती व कामही सुरू झालेले आहे मात्र आतापर्यंत या धरणाच्या नवीन आठ दरवाजांवर 43 कोटी खर्च करूनही अजूनही 60 टक्केच काम पूर्ण झालेले आहे.
अजून जवळपास 40 टक्के काम बाकी आहे व या आज दरवाजांचे काम 2026 पर्यंत पूर्ण करायचे आहे. त्यासाठी 13 कोटीचा निधी तरतूद करण्यात आलेली आहे.
ज्या आठ दरवाजांच्या निर्मितीला 24 वर्षांचा कालावधी लागलेला आहे व 60 टक्के काम झालेले आहे त्याचे उर्वरित 40 टक्के चे काम येत्या दोन वर्षात पूर्ण होईल का हा प्रश्न उपस्थित होत आहे.
तसेच हातनुर धरणामध्ये आतापर्यंत 54 टक्के गाळ साचलेला आहे. या धरणातील गाळाचे प्रमाण वाढू नये म्हणून दीड मीटर खोलीने हे आठ दरवाजांची निर्मिती करण्याचं ठरवण्यात आलेले होते. कारण पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पूर्णा नदीतून गाळ वाहून हातनुर धरणामध्ये येत असतो.
तसेच 2022 मध्ये या आठ दरवाजांच्या डिझाईन मध्ये सी डी ओ ने काही बदलही केल्याचे सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे. व या आठ दरवाजांची निर्मिती हैदराबादची प्रसाद कंपनी ही काम करीत आहे. मात्र सध्याला सुरू असलेले काम हे अत्यंत संत गतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे.
पूर्णा नदीवर जळगाव जामोद येथे जिगाव मध्ये मध्यम प्रकल्प चे काम सुरू आहे. त्यामुळे पूर्णातून येणारा गाळ चे प्रमाण काही प्रमाणात कमी होईल तसेच या आठ दरवाजांच्या निर्मितीनंतर बहुतांशी गाळ हा पावसाळ्यात या मार्गाने वाहून जाईल यासाठी या दरवाजांची निर्मिती करण्यात येत आहे.