

जळगाव : हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 48 तासांत जोरदार पाऊस झाल्याने धरणातील पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रविवार (दि.17) रोजी 292.4 मि.मी. तर सोमवार (दि.18) रोजी अवघ्या 4 तासांत 198.8 मि.मी. असा एकूण 491.2 मि.मी. पाऊस नोंदवला आहे.
पाण्याच्या वाढत्या आवकेमुळे 18 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता धरणाचे 4 दरवाजे पूर्णपणे आणि 16 दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले होते. त्यानंतर पाण्याची पातळी वाढल्याने सोमवार (दि.18) रोजी दुपारी 1 वाजता 6 दरवाजे पूर्णपणे व 14 दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले.
हातनुर धरण स्थिती – सोमवार (दि.18)
सकाळी 10 वाजता : पाणीपातळी : 211.200 मी.
एकूण संचय : 244.00 मी.मी. (62.89%)
लाइव्ह स्टोरेज : 111.00 मी.मी. (43.53%)
डिस्चार्ज : 1598 क्युमेक्स (56,433 क्युसेस)
गेट स्थिती : 4 गेट पूर्णपणे, 16 गेट 1 मीटरने
कॅनल रिचार्ज : 2.83 क्युमेक्स (100 क्युसेस)
दुपारी 1 वाजता : पाणीपातळी : 211.210 मी.
एकूण संचय : 244.40 मी.मी. (62.99%)
लाइव्ह स्टोरेज : 111.40 मी.मी. (43.69%)
डिस्चार्ज : 1833 क्युमेक्स (64,732 क्युसेस)
गेट स्थिती : 6 गेट पूर्णपणे, 14 गेट 1 मीटरने
कॅनल रिचार्ज : 2.83 क्युमेक्स (100 क्युसेस)
पर्जन्यमान आकडेवारी
रविवार (दि.17) रोजी (24 तासांत) :
एकूण पाऊस : 292.4 मि.मी.
सरासरी पाऊस : 32.5 मि.मी.
सोमवार (दि.18) रोजी (24 तासांत) :
एकूण पाऊस : 198.8 मि.मी.
सरासरी पाऊस : 22.1 मि.मी.
सध्या हतनूर धरण 63 टक्क्यांपर्यंत भरले असून, दरवाजे उघडल्यामुळे पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.