Hatnur Dam | हातनूरच्या पाणलोट क्षेत्रात 192 मिलिमीटर पाऊस

सहा दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले
Hatnur Dam- Six doors opened by half a meter
हातनूर धरणाचे सहा दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले Pudhari File Photo

जळगाव : भुसावळ तालुक्यातील हातनुर धरण हे जळगाव जिल्ह्यातील मोठे धरण असून सिंचन तसेच पाणीपुरवठा औद्योगिक क्षेत्रासाठी सर्वाधिक पाणीपुरवठा चे महत्वाचे धरण आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये दि. 29 च्या रात्री 192 मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे. तसेच आजपर्यंत तेराशे मिलिमीटर पाऊस झालेला आहे. तरी सकाळी सात वाजेला हातनुर धरणाचे सहा दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहे.

हतनूर प्रकल्प

Summary
  • दिनांक - 29/06/20246145 क्युसेक्स

  • वेळ -07.00 Hrs

  • पाणी पातळी - 210.240 मी.

  • एकुण पाणी साठा= 204.20 दलघमी.

  • एकुण पाणी साठा टक्केवारी = 52.63%

  • विसर्ग- 174.00 क्युमेक्स (6145 क्युसेक्स)

  • दरवाज्यांची सद्य स्थिती - 6 दरवाजे 0.5 मी. उघडे

हातनुर धरणातून जळगाव एमआयडीसी भुसावळ नगरपालिका यावल सिंचन क्षेत्रासाठी दिपनगर औष्णिक विद्युत केंद्रासाठी रेल्वेसाठी पाणीपुरवठा केला जातो. या धरणाच्या पाणलोट क्षेत्र असलेल्या बराणपुर 44.8, देड तलाई 26.2, एरंडी 24, गोपालखेडा 42, लाखपुरी 23.8, लोहटार 24.8, अकोला एक मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे. अशा या पाणलोट क्षेत्रात दि. 29 च्या रात्री 192 मिलिमीटर पावसाची नोंद झालेली असून आजपर्यंत तेराशे मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे. हातनूर परिसरात 32 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचे आगमन झाल्यामुळे हातनुर धरणाचे लेवल कायम ठेवण्यासाठी हातनुर धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेली माहिती मिळत आहे. सहा दरवाजांमधून 6145 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणामध्ये 52.63 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news