Gulabrao Patil Controversy: भाजप जसे दुसरे पक्ष फोडतोय तसे शिक्षकांनीही.. गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यावर भाजपला लागली मिरची

Gulabrao Patil Controversy
Gulabrao Patil Controversypudhari
Published on
Updated on

Gulabrao Patil Statement Controversy: मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी नुकतेच भाषेच्या मुद्द्यावरून जळगावमध्ये एक विधान केलं. मात्र त्यांच्या या वक्तव्याने भाजपला चांगलीच मिरची लागली आहे. गुलाबराव पाटील यांनी भारतीय जनता पार्टी जसे दुसरे पक्ष फोडून आपल्याकडे आणते तसे मराठी शिक्षकांनी देखील इंग्रजी माध्यमांच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या बाबतीत करायला हवं असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. आता एकनाथ शिंदेच्या पक्षातील मंत्र्याने केलेल्या या धाडसी विधानावर भाजप नाराज झाल्याचे दिसले.

Gulabrao Patil Controversy
Gulabrao Patil | ‘नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न’; विरोधकांच्या टीकेला गुलाबराव पाटलांचा टोला

जळगावमध्ये गुलाबराव पाटील यांनी मराठी माध्यमातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यावर भर दिला पाहिजे असं सांगितलं. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार गुलाबराव पाटील म्हणाले की, 'जसं भाजपं आमच्या लोकांना फोडतं आणि एका पार्टीतून दुसऱ्या पार्टीत घेऊन जातं. तसेच शिक्षकांनी देखील इंग्रजी माध्यमांमधील शाळांच्या मुलांना फोडून आणून मराठी शाळांमध्ये भर्ती केलं पाहिजे.

Gulabrao Patil Controversy
Gulabrao Patil | "मी भोळा राहिलो असतो, तर भाजपवाल्यांनी मला खाऊन टाकले असते” : गुलाबराव पाटील

भाजप कोणालाही सामील करून घेते

गुलाबराव पाटील इथंच थांबले नाहीत. त्यांनी, 'काळ बदलला आहे आता आई-वडील जास्तीकरून इंग्रजी माध्यामांच्या शाळांकडे झुकले आहेत. प्रत्येक मुलाच्या आई वडिलांना त्यांच्या मुलाने इंग्रजी शिकलं पाहिजे असं वाटतं. आज वडील आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी काहीही करण्यास तायर आहे.'

ते पुढे म्हणाले की, 'मी असं ऐकलं आहे की जळगावमध्ये मराठी शाळांमध्ये प्रवेश वाढत आहेत. ज्या प्रकारे भाजप आमच्या नेत्यांना एका पार्टीतून दुसऱ्या पार्टीत घेऊन येतं तसं शिक्षकांनी देखील इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना मराठी माध्यमांच्या शाळेत घेऊन आलं पाहिजे. भाजप कोणालाही आपल्या पक्षात सामील करून घेतं.'

Gulabrao Patil Controversy
Gulabrao Patil: महायुतीविरुद्ध शड्डू ठोकणाऱ्यांना भाजपात प्रवेश देणे अयोग्य; शिंदेंच्या मंत्र्यांनी टोचले कान

भाजप झाली नाराज

गुलाबराव पाटील यांच्या या वक्तव्यावर भाजप नेत्यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. भाजप नेते राम कुलकर्णी म्हणाले की, 'भाजप कधीही कार्यकर्त्यांना फोडून आपल्या पक्षात सामील करत नाही. आम्ही आमच्या कामाने लोकांची मने जिंकतो. कार्यकर्ता आमच्या नेतृत्व आणि विचारधारेवर विश्वास ठेवून आपल्या मर्जीने पक्षासोबत जोडले जातात. शिक्षकांना विद्यार्थांना फोडून आणायचं नाहीये. त्यांना चांगले नागरिक होण्यासाठी त्यांच्यात संस्कारांचे बीज रोवायचे आहे. शिक्षकांसाठीच्या व्यासपीठावरून राजकीय भाष्य करणे चुकीचं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news