Gulabrao Patil | जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सी.सी.टी.व्ही बसवणार

जळगाव : विद्यार्थ्यांची सुरक्षितता सर्वात महत्वाची; जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सी.सी.टी.व्ही बसवणार
Gulabrao Patil,Minister of Water Supply and Sanitation of Maharashtra
Gulabrao Patil www.pudhari.newsfile photo
Published on
Updated on

जळगाव : जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सी.सी.टी.व्ही लावण्याची सूचना राज्य शासनाने दिली आहे. त्याप्रमाणे जिल्हा परिषद शाळेत सी.सी.टी.व्ही लावणार असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil,Minister of Water Supply and Sanitation of Maharashtra) यांनी दिली. जिल्हा नियोजन भवनमध्ये जिल्ह्यातील सर्व विभागाच्या चालू वर्षाच्या नियोजन निधीच्या खर्चाच्या संदर्भात आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, अपर मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सूर्यवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील उपस्थित होते.

आचारसंहिता लागण्यापूर्वी सर्व यंत्रणांनी मंजूर कामाच्या 100 टक्के वर्कऑर्डर 31 सप्टेंबरपर्यंत पूर्ण कराव्यात असे निर्देश देऊन सन 2024-25 अंतर्गत दिनांक 5 सप्टेंबर 2024 पूर्वी जिल्हा परिषदेने उर्वरित 100 टक्के कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात याव्यात अशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

राज्य शासकीय यंत्रणांनी दिनांक 31 ऑगस्ट पर्यंत 100 टक्के कामांना प्रशासकीय मान्यतेसाठीचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती कार्यालयाकडे सादर करावेत. जेणेकरुन आचारसंहितेपूर्वी कार्यारंभाचे आदेश देऊन कामे सुरु करता येऊ शकतील. मागील कालावधीत 100 टक्के निधी खर्च झाला त्याप्रमाणे येत्या काळातही सहकार्य करण्याचे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी केले.

मंजूर कामे दर्जेदार व मुदतीत पूर्ण करुन प्रशासकीय दिरंगाई व कामाच्या गुणवत्तेतील चालढकल खपवून घेतली जाणार नाही असे सांगून जिल्ह्यातील ओ.डी.आर.आणि व्ही. आर. रस्त्यांच्या दर्जोंन्नतीसाठीच्या कामांचे प्रस्ताव शासनाकडे तत्काळ सादर करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

प्रलंबित असलेली व खासदार, आमदार यांनी नव्याने सुचविलेली कामे मार्गी लावावीत. महावितरण, वन विभाग, अंगणवाडी बांधकामे, कौशल्य विकासची कामे, परिवहन विभाग यांच्याकडील कामे तत्काळ मंजूर करावेत अशा सूचनाही पालकमंत्री यांनी यावेळी दिल्या. ज्या प्रमाणे "मुख्यमंत्री लाडकी बहिण" योजनेअंतर्गत तळागाळातील सर्वसामान्य भगिनांना लाभ मिळाला. लखपती दीदी कार्यक्रमासाठी सर्व यंत्रणांनी व लोकप्रतिनिधींनी सहकार्य केले. त्याच प्रमाणे मुख्यमंत्री वयोश्री योजना व तीर्थदर्शन कार्यक्रम योजनांचा वृद्धांना लाभ मिळावा याकरीता या योजनांची सक्षमतेने अंमलबजावणी करण्याचे निर्देशही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सर्व विभागाच्या कामाचे सादरीकरण करून विविध विभागांना कामाचा वेग वाढविण्याची सूचना दिली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news