

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होणार यावर अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. शेवटी राज्याचे सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्र्यांची घोषणा झाली. यामध्ये जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून गुलाबराव पाटील यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्याला तीन कॅबिनेट मंत्री या महायुतीच्या सरकारमध्ये मिळालेले आहेत. यामध्ये जळगाव ग्रामीणचे आमदार गुलाबराव पाटील यांच्यावर पुन्हा जळगाव जिल्ह्याच्या पालक मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. तर येत्या काळात येणाऱ्या कुंभमेळ्याची जबाबदारी म्हणून नाशिकचे पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन यांच्यावर सर्व जबाबदारी टाकण्यात आलेली आहे. भुसावळचे आमदार व वस्त्र उद्योग मंत्री संजय सावकारे यांना भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आलेले आहे.