

Amalner Train Derailment Train Route Diversion
जळगाव : भुसावळ - नंदुरबार रेल्वे मार्गावर एक मालगाडी अमळनेर शहरातील प्रताप महाविद्यालयाजवळ आज (दि. १५) दुपारी २ वाजता रुळावरून घसरली. त्यामुळे काही गाड्यांचे मार्ग वळविण्यात आले आहेत. तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
गाडी क्र. 09066 छपरा – सुरत विशेष गाडी ही भुसावळ, मनमाड, इगतपुरी, कल्याण, वसई रोड, सुरत मार्गे वळविण्यात आली आहे.
गाडी क्र. 19046 छपरा – सुरत एक्सप्रेस ही भुसावळ, मनमाड, इगतपुरी, कल्याण, वसई रोड, सुरत मार्गे वळविण्यात आली आहे.
गाडी क्र. 22723 नांदेड – श्री गंगानगर एक्सप्रेस ही जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, उज्जैन, रतलाम, चित्तौडगड, अजमेर, मारवाड मार्गे वळविण्यात आली आहे.
गाडी क्र. 20934 दानापूर – उधना एक्सप्रेस ही भुसावळ, मनमाड, इगतपुरी, कल्याण, वसई रोड, सुरत मार्गे वळविण्यात आली आहे.
गाडी क्र. 06157 चेन्नई सेंट्रल – भगत की कोठी विशेष गाडी ही भुसावळ कॉर्ड लाईन, खंडवा, इटारसी, भोपाळ, उज्जैन, रतलाम, चित्तौडगड, अजमेर, मारवाड मार्गे वळविण्यात आली आहे.
गाडी क्र. 22972 पाटणा – बांद्रा टर्मिनस एक्सप्रेस ही भुसावळ, मनमाड, इगतपुरी, कल्याण, वसई रोड, बांद्रा टर्मिनस मार्गे वळविण्यात आली आहे.
गाडी क्र. 20861 पुरी – अहमदाबाद एक्सप्रेस ही भुसावळ कॉर्ड लाईन, खंडवा, इटारसी, भोपाळ, उज्जैन, रतलाम, अहमदाबाद मार्गे वळविण्यात आली आहे.
रद्द करण्यात आलेल्या गाड्या (दिनांक 15.05.2025):
गाडी क्र. 19004 भुसावळ – दादर एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.
गाडी क्र. 19006 भुसावळ – सुरत एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.
गाडी क्र. 19008 भुसावळ – सुरत एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.