Gold Silver Price Hike: सोन्या-चांदीचा उच्चांकी 'भडका', चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड!

एकाच दिवसात चांदी २३ हजारांनी महागली : सोन्याने गाठला १ लाख ६४ हजारांचा टप्पा
Silver Price rise
Silver Price rise | चांदीची बुलेट ट्रेन सुसाट
Published on
Updated on

जळगाव : 'सुवर्णनगरी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावात सोन्या-चांदीच्या दराने आजवरचे सर्व उच्चांक मोडीत काढत अक्षरशः उसळी घेतली आहे. अवघ्या एका दिवसात चांदीच्या दरात तब्बल २३ हजार रुपयांची प्रचंड वाढ झाली असून, सोन्यानेही ४ हजार ७०० रुपयांची झेप घेतली आहे.

Silver Price rise
Jalgaon crime news | वाळूच्या ट्रॅक्टरसाठी ३० हजारांची 'लाच'; दोन तलाठी एसीबीच्या जाळ्यात!

काल (२७ जानेवारी) स्थिर वाटणारी बाजारपेठ आज (२८ जानेवारी) सकाळी उघडताच दरांच्या भडक्याने हादरून गेली. २७ जानेवारीला १ लाख ५९ हजार ३०० रुपयांवर असलेले २४ कॅरेट सोने आज थेट १ लाख ६४ हजार रुपयांवर पोहोचले. तर, २२ कॅरेट सोन्यातही मोठी वाढ होऊन ते १ लाख ५० हजार २२५ रुपयांवर गेले आहे.

Silver Price rise
Jalgaon Crime | बाफना ज्वेलर्स'वर डल्ला मारणाऱ्याच्या तेलंगणात आवळल्या मुसक्या; स्थानिक गुन्हे शाखेची 'सिंघम' कामगिरी

चांदीचा भाव गगनाला, ३ लाख ६८ हजारांवर!

सर्वांत मोठा धक्का चांदीच्या दरात बसला आहे. २७ जानेवारीला ३ लाख ४५ हजार रुपये किलो असलेली चांदी आज एकाच झटक्यात ३ लाख ६८ हजार रुपयांवर पोहोचली आहे. एका दिवसात तब्बल २३ हजार रुपयांची वाढ झाल्याने गुंतवणूकदारही अवाक झाले आहेत.

Silver Price rise
Jalgaon News | गिरीश महाजनांना डॉ. बाबासाहेबांच्या नावाची 'ॲलर्जी'; समता सैनिक दलाची जळगावात निदर्शने

२७ व २८ जानेवारीची तुलनात्मक दरवाढ (प्रति १० ग्रॅम/किगा):

२२ कॅरेट सोने

१,४६,५६० रु.

१,५०,२२५ रु.

+ ३,६६५ रु.

२४ कॅरेट सोने

१,५९,३०० रु.

१,६४,००० रु.

+ ४,७०० रु.

Silver Price rise
Jalgaon Accident : आनंदाला गालबोट! नवीन कारच्या कामासाठी शहरात येत असताना भीषण अपघात; आजोबासह नातू ठार, आजी गंभीर

चांदी (प्रति किलो)

३,४५,००० रु.

३,६८,००० रु.

+ २३,००० रु.

सोन्या-चांदीचे दर आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. "लग्नासाठी सोने घ्यायचे तरी कसे?" असा उद्विग्न सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news