Gold-Silver Price Big Drop : सोने तीन दिवसांत ६,५३६ रुपयांनी स्वस्त; चांदी ३,५४० रुपये घसरून १.७७ लाखावर

ऑल टाईम हायपासून चांदी २.०२ लाख रुपयांनी घसरली
Gold Silver Price Today
Gold Silver Price TodayPudhari
Published on: 
Updated on: 

जळगाव : लग्‍नसराईसाठी सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. सोन्याची किंमत ७ महिन्यांनंतर १.३६ लाख रुपये प्रति १० ग्रॅमच्या खाली आली आहे. यापूर्वी २३ मार्च २०२६ रोजी सोने १,३५,१४१ रुपयांवर आले होते. ‘इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन’ (आयबीजेए) नुसार, १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याच्या दरात शुक्रवारी १,८०८ रुपयांची घसरण होऊन ते १,३५,८८४ रुपयांवर आले आहे. एक दिवस आधी ते १.३८ लाख रुपयांवर होते. यापूर्वी ८ जानेवारी २०२६ रोजी सोने १,३५,७७३ रुपयांवर होते.

एक किलो चांदीच्या दरात ३,५४० रुपयांची घट होऊन ती १.७७ लाख रुपयांवर आली आहे. गुरुवारी चांदीचा दर १.८१ लाख रुपये होता. सलग तीन दिवसांत सोने ६,५३६ रुपयांनी आणि चांदी ८,५०० रुपयांनी स्वस्त झाली आहे. १० नोव्हेंबर रोजी सोन्याचा दर १.४२ लाख रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचा दर १.८६ लाख रुपये प्रतिकिलो होता. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर मजबूत झाल्यामुळे आणि मोठ्या गुंतवणूकदारांनी उच्च दरांवर विक्री केल्यामुळे सोने-चांदीच्या किमतीत घसरण होत आहे.

ऑल टाईम हायपासून चांदी २.०२ लाख रुपयांनी घसरली

यावर्षी सोने-चांदीच्या किमतीत सतत चढ-उतार पाहायला मिळत आहेत. ३१ डिसेंबर २०२५ रोजी चांदीची किंमत २.३० लाख रुपये होती, जी २९ जानेवारी रोजी ३.८६ लाख रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली होती. त्यानंतर आतापर्यंत चांदी २.०२ लाख रुपयांनी म्हणजेच सुमारे ११४ टक्‍के स्वस्त झाली आहे.

त्याचवेळी, ३१ डिसेंबर २०२५ रोजी सोन्याचा दर १.३३ लाख रुपये होता, जो २९ जानेवारी रोजी वाढून १.७६ लाख रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला होता. त्यानंतर आतापर्यंत सोने ४० हजार रुपयांनी म्हणजेच सुमारे ३० टक्‍के स्वस्त झाले आहे.

सोने स्वस्त होण्याची ३ कारणे

  • चढ्या भावात विक्री : सणांपूर्वी सोने महाग झाले होते, त्यामुळे मोठ्या गुंतवणूकदारांनी नफा कमावण्यासाठी आपले सोने विकण्यास सुरुवात केली.

  • मजबूत डॉलरचा परिणाम : आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकी डॉलर आणि रोखे मजबूत झाले, त्यामुळे जागतिक बाजारात सोन्याच्या किमती खाली आल्या.

  • खरेदीदारांनी हात आखडता घेणे : विक्रमी महाग दर पाहून सामान्य खरेदीदारांनी सध्या दुकानांतून सोन्याची खरेदी कमी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.