Ganesh Festival Theft | गणेशोत्सवात चोरीचा प्रकार: अपार्टमेंटमधून पाच तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपट

CCTV Footage | अपार्टमेंट परिसरात दुचाकीवरून आलेले दोन भामटे सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
Ganesh Festival Theft
गणेशोत्सवात चोरीचा प्रकार: अपार्टमेंटमधून पाच तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपट(Pudhari File Photo)
Published on
Updated on

Gold Jewelry Stolen

जळगाव : गणेश विसर्जनाची मिरवणूक पाहण्यास गेलेल्या कुटुंबियांच्या घराचे कुलूप अज्ञात दोन चोरटयांनी तोडून घरातील कपाटामध्ये असलेले पाच तोळ्यांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना शहरातील नारायण पार्क परिसरातील श्री अपार्टमेंटमध्ये ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ ते रात्री १० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान अपार्टमेंट परिसरात दुचाकीवरून आलेले दोन भामटे सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

रुचीता पवार यांनी दिलेल्या माहिती नुसार, नारायण पार्क परिसरातील श्री अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या रुचिता पवार या आपल्या कुटुंबियांसह जळगाव शहरातील गणेश विसर्जन दुपारी ४ ते १० यावेळेस पाहण्यास गेल्या असता रात्री घरी परत आल्यानंतर मुख्य दरवाजाचे कुलूप चोरट्यांनी तोडलेले आढळून आले. आत बघितले असता चोरटयांनी कपाट तोडून त्यातील सोन्याचे ५ तोळे वजनाचे दागिने चोरून नेले.

Ganesh Festival Theft
Jalgaon : अल्पवयीन मुलीवर चुलत भावासह दोघांचा अत्याचार; तिघांविरोधात पोक्सोचा गुन्हा दाखल

इतर सामान पलंगावर अस्ताव्यस्त केलेल्या अवस्थेत दिसून आढळून आले. सुदैवाने घरात असलेली रोख रकम मात्र सुरक्षीत असून चोरट्यांना रोकडचा ठाव न लागल्याने ते, त्या रकमेला हात लावला दागिने घेत पसार झाले.

Ganesh Festival Theft
Jalgaon News: शाळेत खेळताना अचानक जमिनीवर कोसळला, नववीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू; इतर विद्यार्थ्यांकडून मारहाणीचा आरोप

श्वानपथक दाखल

शहरातील नारायणीपार्क श्री अपार्टमेंट मधील पवार यांच्या बंद फ्लॅटचा कुलूप तोडून चोरट्यांनी डल्ला मारला. पवार कुटूंबीय गणेश विसर्जन मिरवणुकीतून परतल्यावर त्यांना कुलूप तूटलेले आणि दार उघडे दिसले घरात गेल्यावर त्याना चोरी झाल्याचे आढळून आल्याने तत्काळ त्यांनी शहर पोलिसांना घटनेची माहिती दिली. शहर पोलिसांसह गुन्हेशाखेचे पथक, ठसे तज्ञ, श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले असून रात्री शहर पोलिसात अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news