

जळगाव : महिलांना सक्षम करण्यासाठी शक्ती फाऊंडेशनतर्फे निराधार व गरजू महिलांसाठी मोफत पिंक ऑटो रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षणचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचा 50 महिला लाभ घेत आहे.
विवेकानंद नगर येथील शक्ती फाऊंडेशन, संपर्क कार्यालय येथे संस्थापक अध्यक्ष भारती रंधे व ॲड. अभिजीत रंधे यांच्या संकल्पनेतून निराधार व गरजू महिलांना स्वावलंबी व सक्षम करण्याकरिता महिलांना मोफत पिंक ऑटो रिक्षा प्रशिक्षण शिबिराचे उदघाटन झाले. शिबिराच्या उदघाटन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून शहराचे आ. राजूमामा भोळे, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, शिवसेना महिला जिल्हा प्रमुख सरिता माळी-कोल्हे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आशिष सपकाळे, योगा प्रशिक्षक नेहा तळेले, ब्युटी पार्लर प्रशिक्षक प्रियांका नारखेडे, अशोक म्हस्के, कोमल वाडे तसेच शिवसेना पदाधिकारी निशा पवार, डॉ.सुषमा चौधरी, पुष्पाताई तळेले, ममता जंजाळे उपस्थित होते. रंजना सपकाळे या महिलांना प्रशिक्षणाचे धडे देत आहेत.
बचाव पक्ष सरकारी वकील व संस्थेचे अध्यक्ष ॲड. अभिजीत रंधे यांनी सूत्रसंचालन केले. संस्थापक अध्यक्ष भारती रंधे यांनी प्रास्ताविक केले. कोमल वाडे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रकाश सोनवणे, प्रियांका रंधे, मोहित सावडेकर, लताताई ढोबळे, सुमन भालेराव, उज्वलाताई शेजवळ, बेबीनंदा म्हस्के, संगीताताई मोरे, निलूताई इंगळे यांनी परिश्रम घेतले.