बापानेही संपवले जीवन, मुलाचाही झाला खून! नेमकं काय घडलं?

जळगावातील घटनेने खळबळ
बापानेही संपवले जीवन, मुलाचाही झाला खून! नेमकं काय घडलं?
File Photo
Published on
Updated on

जळगाव : धरणगाव तालुक्यातील रिल स्टार असलेल्या एका तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळून आला आहे. त्याच्या वडिलांनी दोन दिवसांपूर्वी सुसाईड नोट लिहून जीवन संपवल्याची घटना समोर आली होती.

या संदर्भात अधिक माहिती अशी की,धरणगाव तालुक्यातील भोरखेडा आणि हल्ली मुक्काम एरंडोल येथे विकी उर्फ हितेश विठ्ठल पाटील (वय-२२) हा तरुण राहत होता. त्याचे आईवडील देखील वेगळे एरंडोल शहरात राहत होते. त्याचे वडील विठ्ठल सखाराम पाटील हे माजी सैनिक होते.

रिल स्टार विकी पाटील हा दोन दिवसांपासून बेपत्ता होता. दुसरीकडे २५ रोजी विठ्ठल पाटील यांनी गळफास घेवून जीवन संपवले होते. अशातच २७ रोजी दुपारच्या सुमारास विकी पाटील यांचा मृतदेह भोरखेडा गावाजवळ असलेल्या एका नाल्याजवळ पुरल्याची माहिती पोलीसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलीसांनी जेसीबीच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. तो कुजलेल्या अवस्थेत मिळून आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव येथून पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षिका कविता नेरकर यांच्यासह धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पवनकुमार देसले आणि पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान या घटनेचा पोलिसांनी पंचनामा केला.या घटनेमागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे प्रक्रिया सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news