

जळगाव | गुड गव्हर्नन्स मध्ये गेल्या वेळेस जळगाव जिल्हा बाराव्या क्रमांकावर होता मात्र यावेळेस तो खाली घसरला आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू आहे. तसेच वाळू वाहतुकीवर कारवाईचे आदेश दिलेले आहेत तसेच डम्परांवर कारवाई करण्यासाठी आरटीओ व पोलिसांना सूचना देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
कालिंका माता चौकात झालेल्या घटनेत बालकाच्या मृत्यूनंतर जिल्हा प्रशासनाने कठोर कारवाई करण्याचे आदेश संबंधित विभागांना दिले आहेत. रात्री मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत आहे. इथे अनेक गावकऱ्यांनी व ग्रामस्थांनी तक्रारी केल्या आहेत. अनेक गावे यांना सहकार्य करण्यास तयार नाही तसेच जिल्ह्यामध्ये वाळूचे ठेके गेलेले नसल्याचेही त्यांनी सांगितले. तर बांधकाम व्यवसायिकांना घेऊन कच वापरण्याच्या सूचना दिल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. वाळूच्या कारवाईमध्ये आयुक्तांच्या झालेल्या बैठकीत जळगाव जिल्हा राज्यात व विभागात सुद्धा मागे नाही असे त्यांनी सांगितले.
विना क्रमांकाचे डंपर वाळू परवाना नसलेल्यांवर कारवाई किंवा एग्रीकल्चर साठी घेतलेले ट्रॅक्टर इतर कामांमध्ये वापरत असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश विभागाला देण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले तसेच गौण खनिज विभागाला रात्री टीपीचे परमिट निघणार नाही किंवा देण्यात येणार नाही याच्या सूचना देण्यात आल्या.
जळगाव जिल्ह्यात 68 ब्लॅक स्पॉट आहेत. या ठिकाणी लाईट व स्लिप लावण्यात आलेले आहेत तसेच मुख्य रस्त्यावरील संपूर्ण खड्डे बुजण्यात आलेले आहे. हे अपघात कमी होण्यासाठी तरसोद ते पाळधी हा बायपास रस्ता जो 18 किलोमीटरचा आहे तो होणे लवकर गरजेचे आहे. हा रस्ता तयार झाल्यावर मुंबई सुरत नागपूर धुळे याकडे जाणारी वाहने व इथून येणारे वाहने शहरात थेट बाहेरूनच मार्गस्थ होतील व या रस्त्याचे 25 मार्च 2025 पर्यंत पूर्ण होण्याचे संकेत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.
हवामान खात्याने दि. 27 व 28 रोजी जळगाव जिल्ह्यात दहा ते वीस मिलिमीटर पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. मुख्यतः दि. 27 च्या संध्याकाळी तर दि. 28 च्या सकाळपर्यंत ही शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तरी कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या कापसावर ताडपत्री किंवा ते ओले होणार नाही याची काळजी घ्यावी. नगरपालिकांनी गटारी नाले हे साफ करून ठेवण्याच्या सूचना दिल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
गुड गव्हर्नन्स मध्ये गेल्यावर्षी जळगाव जिल्हा हा बारावा क्रमांक आला होता मात्र डेटा एन्ट्री कमी झाल्यामुळे जळगाव जिल्ह्याचा क्रमांक हा घसरलेला आहे. सेवा व हमी मध्ये इन्स्पेक्टरची कमी करण्यामुळे त्यावर भर देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले