मुक्ताईनगर : गत काही महिन्यांमधील महायुतीचा अनुभव सुखदायी नसल्याचे सांगत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आता महाविकास आघाडीचे सरकार याचे, अशी इच्छा प्रकट केली आहे.
खडसे म्हणाले की, महायुती सरकार आल्यापासून त्याचे कारभारी फोडाफोडीच्या राजकारणात गुंतले आहेत. राजकीय प्रतिस्पर्धीं विरोधात्त सूडबुध्दीने ईडी सीबीआयसारख्या संस्थांचा वापर करीत कारवाया करण्यात येत आहेत, या घडामोडीत जनतेची कामे मागे पडत आहेत. राज्यात सरकारच्या बहुचर्चित लाडकी बहीण योजनेला ४६ हजार कोटी, तर स्थायी स्वरूपाची कामे उभी राहण्यासाठी ४६ हजार कोटी देऊन यातून धरणे, रस्त्यांची निर्मिती आदी पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. तसेच यासाठीच विद्यमान सरकार जावे आणि महाविकास आघाडी सरकार यावे, असे आपल्याला वारंवार वाटत असल्याचे खडसे म्हणाले.
लाडकी बहीण योजना सरकारने निवडणुका डोळयासमोर ठेवून आणल्याचे जनतेलाही कळत आहे. ही योजना पाच वर्षांपूर्वीच आणावयास इसी होती. सदर योजनेला आपला विरोध नाही मात्र इकडे केलेला खर्च नियोजित श्रेणीतील नाही. सदर रक्कम धरणे उभारणी, रस्ते निर्मिती आणि तत्सम कामांसाठी खर्च केली असती तर त्यातून रोजगारनिर्मिती होऊ शकली असती, अशी टिप्पणी खडसे केली.