Jalgaon News : नशिराबादच्या 'भाई'ला अखेर 'एमपीडीए'चा दणका; थेट येरवडा कारागृहात रवानगी

सराईत गुन्हेगारावर जिल्हाधिकाऱ्यांचा बडगा; एका वर्षासाठी स्थानबद्ध
Jalgaon News : नशिराबादच्या 'भाई'ला अखेर 'एमपीडीए'चा दणका; थेट येरवडा कारागृहात रवानगी
Published on
Updated on

District Collector takes action against habitual offender; jailed for one year

जळगाव : पुढारी वृत्तसेवा नशिराबाद परिसरात दहशतीचे साम्राज्य निर्माण करून सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील करणाऱ्या कुख्यात गुंड शोएब शेख गुलाम नबी ऊर्फ 'शोएब बिल्डर' (वय ३५, रा. ख्वाजा नगर, नशिराबाद) याच्या मुसक्या आवळण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. जिल्हादंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या गुन्हेगारावर महाराष्ट्र झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करत त्याला वर्षभरासाठी थेट पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात डांबण्यात आले आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे नशिराबाद परिसरातील गुन्हेगार जगतात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Jalgaon News : नशिराबादच्या 'भाई'ला अखेर 'एमपीडीए'चा दणका; थेट येरवडा कारागृहात रवानगी
Gulabrao Patil | ‘नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न’; विरोधकांच्या टीकेला गुलाबराव पाटलांचा टोला

शोएब बिल्डर आणि त्याच्या टोळीने नशिराबाद शहरात अक्षरशः उच्छाद मांडला होता. किरकोळ कारणावरून रस्त्यात गाठून मारहाण करणे, चोऱ्या करणे, बेकायदेशीर जमाव जमवून धारदार शस्त्रांनी हल्ले करणे आणि खुनाचा प्रयत्न करणे अशा गंभीर गुन्ह्यांची मालिकाच त्याच्या नावावर आहे. त्याच्या दहशतीमुळे स्थानिक नागरिक आणि व्यापारी उघडपणे तक्रार देण्यासही धजावत नव्हते. हद्दपारीसारख्या कारवाया होऊनही त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीत तसूभरही फरक पडला नाही; उलट दिवसेंदिवस त्याचा उपद्रव वाढतच चालला होता.

त्याच्यावर खुनाचा प्रयत्न (१), जबरी चोऱ्या (२), रस्ता अडवून घातक शस्त्रांनी गंभीर मारहाण (३) आणि हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन (१).असे गुन्हे होते. वारंवार कारवाया करूनही शोएब सुधारायला तयार नसल्याने नशिराबाद पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता एम. नारखेडे यांनी त्याच्याविरुद्ध एमपीडीएचा परिपूर्ण प्रस्ताव तयार करून पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी / श्रीकांत धिवरे यांच्यामार्फत जिल्हादंडाधिकाऱ्यांकडे पाठवला होता.

Jalgaon News : नशिराबादच्या 'भाई'ला अखेर 'एमपीडीए'चा दणका; थेट येरवडा कारागृहात रवानगी
Martyr Rohit Patil : शासकीय इतमामात लान्स नायक रोहित पाटील यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप

सादर केलेल्या प्रस्तावाची बारकाईने पडताळणी केल्यानंतर, शोएब हा समाजासाठी 'धोकादायक व्यक्ती' असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार जिल्हादंडाधिकाऱ्यांनी आज, ४ सप्टेंबर रोजी त्याला १ वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश जारी केले. आदेश धडकताच नशिराबाद पोलिसांनी तातडीने सापळा रचून शोएब बिल्डरला बेड्या ठोकल्या आणि थेट येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे रवाना केले.

ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली नशिराबादच्या सपोनि योगिता नारखेडे, पोलीस उपनिरीक्षक प्रिया दातीर, पोलीस अंमलदार गुणवंत देशमुख, प्रशांत विरणारे, भरत बाविस्कर, पंकज सोनवणे, प्रवीण लोहार तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार सुनील दामोदरे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news