नेपाळ बस दुर्घटनेतील मृतांचा आकडा निश्चित नाही : गिरीश महाजन

Nepal Bus Accident | स्थानिक प्रशासनाकडून माहिती घेण्याचे काम सुरु
Girish Mahajan
नेपाळ बस दुर्घटनेतील मृतांचा आकडा निश्चित नाही : गिरीश महाजनpudhari photo
Published on
Updated on

जळगाव : नेपाळ येथे झालेल्या बस अपघातात जळगाव जिल्ह्यातील भाविकांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. बस खोल दरीत गेल्यामुळे अनेक जणांचा शोध सुरू असून या अपघातात नेमका किती जणांचा मृत्यू झाला आहे याचा आकडा अजून अधिकृत आलेला नसल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये गिरीश महाजन यांनी दिली. सरकार व प्रशासन दोन्हीही त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांशी व नेपाळ येथील दूतावास यांच्या संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले.

गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत यांसदर्भात माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित हे उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले की, (दि. 23) उत्तर प्रदेश गोरखपुर येथून निघालेली बस दुपारी नेपाळच्या मर्स्यांगडी नदीत कोसळली. या बसमध्ये 43 प्रवासी होते. यामध्ये चार जण मिसिंग आहे. 39 जणांना रेस्क्यू करण्यात आले आहे. 12 जणांना नेपाळ गोरमेंट एअरलिफ्ट कडून काठमांडू येथे रुग्णालयात नेण्यात आले आहे. नऊ जणांना स्थानिक जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. त्या ठिकाणी 18 जण असे आहे त्यांच्याबद्दल अजूनही स्थानिक प्रशासनाने काही माहिती दिलेली नाही अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

यावेळी गिरीश महाजन यांनी सांगितले की, आमच्यापर्यंत अजून अधिकृत अशी माहिती काही आलेली नाही. त्यामुळे आम्ही सुद्धा कन्फ्युज आहोत. अधिकारी व दूतावास यांच्यात बोलणे सुरू आहे. स्थानिक सरकारने मृतांचा आकडा अजून काही निश्चित सांगितलेला नाही. त्यामुळे आम्हालाही याबद्दल काहीही सांगता येत नाही. हे सर्व भाविक भुसावळ तालुक्यातील असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news