

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यामध्ये रविवारी (दि. २७) रात्री अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसात झालेल्या गारपिटमुळे चाळीसगाव तालुक्यामध्ये कांदे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर दोन गाईंचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यामध्ये गेले दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे पिंपळवाड निकुंभ, नांद्रे, तलोंदे प्र दे,काकडणे या चार गावात प्रामुख्याने कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच वीज पडून दोन गायी मृत झाल्याची देखील माहिती आहे. पिकांच्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल सादर करत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील कंट्रोल रूममध्ये कर्मचारी संपूर्ण जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती घेत आहेत.