Jalgaon: दालमिलमध्ये १ लाख १० हजार रुपयांचा ऐवज लंपास

Dal Mill Theft: एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Robbery in Dal Mill
file photo
Published on
Updated on

जळगाव: येथिल औद्योगिक वसाहत परिसरातील महालक्ष्मी युनी एक्झीम प्रा. लि. दालमिलमध्ये मध्यरात्री चोरट्यांनी कार्यालयातून ६० हजार रुपये रोख रक्कम, चांदीचे पूजा साहित्य आणि इतर वस्तू असा एकूण १ लाख १० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, विद्यानगरातील रहिवासी गिरीराज ओमप्रकाश जाजू (५१) यांची औद्योगिक वसाहतीमधील एन-९८ सेक्टरमध्ये दालमिल असुन ३१ जानेवारी रोजी रात्री ते दालमिल बंद करून घरी गेले होते. १ फेब्रुवारी रोजी सकाळी कार्यालयात परतल्यानंतर त्यांनी दरवाजे उघडे असल्याचे पाहिले. परिसरातील कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता, त्यांना कोणतीही माहिती नसल्याचे सांगण्यात आले. नंतर कार्यालयातील टेबल ड्रॉवरची पाहणी केली असता, त्यामधील रोख ६० हजार रुपये, १ किलो वजनाचे ३५ चांदीचे नाणे आणि चांदीचे पूजा साहित्य चोरीला गेल्याचे आढळून आले.

या प्रकरणी ३ फेब्रुवारी रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news