दिलासादायक ! जळगावमध्ये APY, PMJJBY आणि PMSBY योजनांत उल्लेखनीय प्रगती

शासन स्तरापासून जोरदार प्रयत्न
Atal Pension Yojana
Atal Pension YojanaPudhari Photo
Published on
Updated on

जळगाव : जिल्हा परिषदेच्या समन्वयाने जळगाव जिल्ह्यात अटल पेन्शन योजना (APY), प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना (PMSBY) अंतर्गत नोंदणी, नवीन सदस्यांची भरती आणि नुतनीकरणाच्या कामात उल्लेखनीय प्रगती होत असल्याचे दिलासादायक चित्र दिसून येत आहे

जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांची स्थिती अशी ...

  • APY – एकूण २,०९,५२२ सदस्य नोंदणीकृत

  • नवीन नोंदणी : १२,८१५

  • नुतनीकरण : १५४

  • एकूण प्रगती : १२,९६९

PMJJBY – एकूण २,३४,८१६ सदस्य नोंदणीकृत

  • नवीन नोंदणी : ३१,४०८

  • नुतनीकरण : ८,२२३

  • एकूण प्रगती : ३९,६३१

PMSBY – एकूण ३,१४,०८८ सदस्य नोंदणीकृत

  • नवीन नोंदणी : ३७,४६१

  • नुतनीकरण : १,४५,०६४

  • एकूण प्रगती : १,८९,५२५

यामध्ये यावल, रावेर, भडगाव, पाचोरा आणि जामनेर तालुक्यांनी विशेष कामगिरी बजावली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पंचायत समित्यांनी समन्वयाने काम करून या योजना प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचवल्यामुळे जळगाव जिल्ह्यात APY, PMJJBY आणि PMSBY योजनांत उल्लेखनीय प्रगती नोंदवली जात असल्याचे निदर्शनास येत आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना सामाजिक सुरक्षा कवच देण्यासाठी या योजना महत्त्वाचे साधन ठरत असून, आगामी काळात जनजागृती आणि नुतनीकरण मोहिमा राबवून यांचा अधिक व्यापक प्रसार करण्यावर शासन स्तरापासून प्रयत्न केले जात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news