Mangesh Chavan |आ. मंगेश चव्हाण यांना धमकीनंतर चाळीसगावात आंदोलन

धमकी देणाऱ्याला अटक करण्याची मागणी
Mangesh Chavan threat
आमदार मंगेश चव्हाण यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने चाळीसगावात आंदोलन करण्यात आले.file Photo

जळगाव : चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याने जळगावात राजकारण तापले आहे. येथील एका नेत्याने एका कार्यक्रमात प्रक्षोभक असे भाषण करून आमदार मंगेश चव्हाण यांना “माझ्या नादी लागशील तर पिस्तुल आणून गोळी घालून टाकेल रस्त्यावर”अशी जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेचा निषेध म्हणून आज (दि. 24) तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या वतीने निषेध म्हणून धरणे आंदोलन करण्यात आले.

Summary
  • एका नेत्याने आ. मंगेश चव्हाण यांना रस्त्यावर गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी दिली.

  • दोन दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या एका कार्यक्रमात ही धमकी देण्यात आली.

  • या धमकीनंतर जळगावात वातावरण तापले आहे.

  • याविरोधात आंदोलन करण्यात आले आहे.

Mangesh Chavan threat
जळगाव : एकनाथ खडसे यांच्यासह रक्षा खडसे यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्र्याची भेट

पुतळा जाळून निषेध

आंदोलना दरम्यान किसन जोर्वेकर, माजी खासदार उन्मेष पाटील व माजी आमदार राजीव देशमुख यांचा चेहरा असलेला पुतळा आमदार मंगेश चव्हाण यांच्या समर्थकांनी जाळून निषेध केला. यावेळी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई आठवले गट आदी महायुती चे पदाधिकारी, आजी माजी लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, तरुण, युवक विद्यार्थी, महिला व शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

अनेकांनी टाळ्या वाजवून दिली दाद

दोन दिवसांपूर्वी झालेल्या एका बैठकीत महाविकास आघाडीच्या एका नेत्याने आमदार मंगेश चव्हाण यांना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यावेळी महाविकास आघाडीचे नेते माजी खासदार उन्मेष पाटील, माजी आमदार राजीव देशमुख यांच्यासह चाळीसगाव तालुक्यातील महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते. तेव्हा यातील अनेकांनी टाळ्या वाजविल्या तसेच हसून दाद दिली.

पूर्व नियोजित कट असल्याचा आरोप

लोकसभा निवडणुकीत आलेला पराभव जिव्हारी लागल्याने तसेच आमदार मंगेश चव्हाण यांना विधानसभा निवडणुकीत पराभूत करणे अशक्य वाटत असल्याने चाळीसगाव तालुक्यातील महाविकास आघाडीचे माजी खासदार आमदार व पदाधिकारी नैराश्यात गेले आहेत. त्यामुळे सदर धरणे आंदोलन हे पूर्वनियोजित कटाचा भाग असून त्यात मुद्दामून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या हाफ मर्डर, खंडणी, आदी अनेक गुन्हे दाखल असणाऱ्या व्यक्तीला सहभागी केले गेले व त्यांना मुद्दामहून भाषण करण्याची संधी दिली गेली. म्हणून हा कट रचणाऱ्या उन्मेष पाटील, राजीव देशमुख, धरणे आंदोलन आयोजक राष्ट्रवादी शरद पवार गट तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, शिवसेना उबाठा गट तालुकाध्यक्ष रमेश चव्हाण व इतर आयोजक पदाधिकारी यांच्यावर देखील प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून गुन्हा दाखल करावा अशी तक्रार भाजपा शहराध्यक्ष नितीन पाटील यांनी पोलिसांकडे केली आहे. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्याकडे हे निवेदन सुपूर्द करण्यात आले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news