१७ वर्षांच्या लेकीला 3 मुले; बालविवाहाच्या बेडीत आवळला चिमुरडीचा गळा

पारोळा तालुक्यातील 'दगडी सबगव्हाण' हादरले; आई-वडिलांसह पती आणि सासरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल
१७ वर्षांच्या लेकीला 3 मुले; बालविवाहाच्या बेडीत आवळला चिमुरडीचा गळा
Published on
Updated on

जळगाव : जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. वयाच्या ज्या वर्षी हातात पुस्तक असायला हवे, त्या वयात एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला तीन मुलांची माता बनवणाऱ्या पाषाणहृदयी पालकांचे आणि सासरच्या मंडळींचे क्रूर वास्तव समोर आले आहे. मुलीचे वय माहीत असतानाही तिचा बालविवाह लावून देत तिच्या आयुष्याची राखरांगोळी केल्याप्रकरणी आई-वडिलांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी (वय १७) ही अल्पवयीन असल्याचे माहिती असतानाही, तिच्या आई-वडिलांनी (सकुबाई आणि निंबा सोनवणे, रा. गुढे, ता. भडगाव) सन २०२१-२२ च्या सुमारास तिचा विवाह भूषण धर्मा जोगी याच्याशी लावून दिला.

लग्नानंतर पीडितेला सासरी (दगडी सबगव्हाण, ता. पारोळा) आणण्यात आले. तिथे तिचा पती भूषण जोगी याने ती अल्पवयीन असल्याची जाणीव असतानाही तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले. धक्कादायक बाब म्हणजे, वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षात ही मुलगी तीन वेळा गरोदर राहिली. तिने यापूर्वी दोन मुलांना जन्म दिला असून, नुकतेच तिने तिसऱ्या मुलाला जन्म दिला आहे.

पीडितेने नाशिक ग्रामीणच्या ऑनलाईन प्रक्रियेद्वारे मनमाड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तिथून हा शून्य (00/2026) क्रमांकाचा गुन्हा तपासासाठी पारोळा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. पारोळा पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने या सकुबाई निंबा सोनवणे (आई), निंबा भिमराव सोनवणे (वडील), पार्वती धर्मा जोगी (सासू), धर्मा गोरख जोगी (सासरे), भूषण/धर्मा जोगी (पती) पाचही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल दुकळे करत असून, आरोपींना अद्याप अटक झालेली ना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news