Bhusawal To Devlali MEMU | भाऊबीजेला बहिणीकडे जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा; भुसावळ-देवळालीदरम्यान धावणार विशेष मेमू!

रेल्वे प्रशासनाचा निर्णय; १० आणि ११ नोव्हेंबरला चार फेऱ्या, जळगाव, पाचोरा, चाळीसगावच्या प्रवाशांना गर्दीतून दिलासा
Bhusawal railway
Bhusawal railway Pudhari
Published on: 
Updated on: 

Railway Passenger Special Train

जळगाव : दिवाळी आणि भाऊबीजेच्या सणानिमित्त रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने भुसावळ ते देवळालीदरम्यान अनारक्षित विशेष मेमू (MEMU) गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. १० आणि ११ नोव्हेंबर रोजी या गाडीच्या एकूण चार फेऱ्या होणार आहेत. त्यामुळे दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये गावी जाणाऱ्या तसेच भाऊबीजेसाठी बहिणीकडे जाणाऱ्या खान्देशातील चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दिवाळीच्या सुट्ट्या आणि भाऊबीजेच्या पार्श्वभूमीवर नियमित रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. अनेक गाड्यांचे आरक्षण आधीच पूर्ण झाल्याने ऐन सणासुदीच्या काळात प्रवाशांना प्रवासासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन प्रवाशांची अतिरिक्त गर्दी विभागण्यासाठी रेल्वे प्रशासनाने १२ डब्यांची अनारक्षित विशेष मेमू गाडी चालविण्याचे नियोजन केले आहे.

Bhusawal railway
Bhusawal Police Raid | भुसावळ तालुक्यात गावठी दारूच्या अड्ड्यांवर पोलिसांचे छापेसत्र; १० गुन्हे दाखल

असे असेल विशेष मेमूचे वेळापत्रक

गाडी क्रमांक ०१२२६ (भुसावळ ते देवळाली) : ही विशेष गाडी १० आणि ११ नोव्हेंबर रोजी भुसावळ येथून सकाळी ९.१५ वाजता सुटेल. दुपारी १.०५ वाजता देवळाली येथे पोहोचेल.

गाडी क्रमांक ०१२२५ (देवळाली ते भुसावळ) : परतीच्या प्रवासात ही गाडी १० आणि ११ नोव्हेंबर रोजी देवळाली येथून दुपारी १.३० वाजता सुटेल आणि सायंकाळी ५ वाजता भुसावळ येथे पोहोचेल.

जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांना फायदा

ही विशेष मेमू गाडी जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, लासलगाव आणि नाशिक रोड या प्रमुख स्थानकांवर थांबणार आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यासह मार्गावरील अन्य स्थानकांतील प्रवाशांना नाशिकच्या दिशेने प्रवास करण्यासाठी अतिरिक्त रेल्वे सुविधा उपलब्ध होणार आहे. सणासुदीच्या काळात नियमित गाड्यांवरील गर्दीचा ताण कमी करण्यासाठीही या विशेष गाडीची मदत होणार आहे.

Bhusawal railway
Bhusawal railway scrap sale|भुसावळ रेल्वे विभागाची भंगार विक्रीतून विक्रमी 'कमाई'; ५० कोटी रु.चा टप्पा अवघ्या काही महिन्यांत पार!

या गाडीच्या थांब्यांचा तपशील आणि वेळापत्रकातील संभाव्य बदल जाणून घेण्यासाठी प्रवाशांनी रेल्वेचे अधिकृत संकेतस्थळ किंवा एनटीईएस (NTES) ॲपचा वापर करावा. तसेच या विशेष रेल्वेसेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन भुसावळ रेल्वे प्रशासनाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.