अमळनेर अन् चोपड्यात चोरट्यांची 'बॅटिंग', दोन वेगवेगळ्या घटनांत लाखांचा ऐवज लंपास

Jalgaon theft | अमळनेरात घर फोडले, तर चोपड्यात मंदिराची दानपेटीही पळवली
Jalgaon theft
Jalgaon theftPudhari
Published on
Updated on

जळगाव : जिल्ह्यात चोरट्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अमळनेर शहरात बंद घराचे कुलूप तोडून ७० हजारांचा ऐवज लांबवला. तर चोपडा तालुक्यातील निमगव्हाण येथे चोरट्यांनी घरासह मंदिराच्या आवारातील दानपेटीवरही डल्ला मारला. या दोन्ही घटनांमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

अमळनेरात दिवसाढवळ्या घरफोडी

अमळनेर येथील समर्थ नगर (पिंपळे रोड) भागात ही घटना घडली. फिर्यादी हेमंत प्रकाश विसपुते हे खाजगी नोकरीनिमित्त बाहेर असताना, चोरट्यांनी त्यांच्या बंद घराला लक्ष्य केले. ८ एप्रिल ते १२ एप्रिल या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे ग्रिलचे कुलूप आणि कोयंडा तोडून आत प्रवेश करून ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे कानातील काफ (४ ग्रॅम), ८ हजार रुपयांची चांदीची लक्ष्मीची मूर्ती, समई आणि फुलपात्र असा एकूण ७०,००० रुपयांचा माल लंपास झाला. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद भोई पुढील तपास करत आहेत.

चोपड्यात मंदिराची दानपेटीही फोडली

चोपडा तालुक्यातील निमगव्हाण येथे चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत समाधान धनसिंग बाविस्कर यांचे घर फोडले. १८ एप्रिलच्या रात्री चोरट्यांनी घराचा मागील दरवाजा उचकावून आत प्रवेश केला आणि धान्याच्या कोठीत ठेवलेले दागिने चोरले. एवढ्यावरच न थांबता, जवळच असलेल्या जयश्री दादाजी धुनीवाले दरबार मंदिराच्या आवारातील चारचाकी वाहनात ठेवलेली दानपेटीही चोरट्यांनी पळवली.या दानपेटीत २४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे पेंडल (५ ग्रॅम)२,२६० रुपयांच्या चांदीच्या पाटल्या दानपेटीतील २,००० रुपयांची रोकड असा एकूण २८,२६० रुपयांचा ऐवज चोरीला गेला. या घटनेचा तपास चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक संदीप नन्नवरे करत आहेत.

एकीकडे कडक उन्हामुळे नागरिक हैराण असताना, चोरट्यांनी मात्र चोरीचे सत्र जोरात सुरू ठेवले आहे. अमळनेर आणि चोपडा या दोन्ही घटनांत चोरट्यांनी घरफोडीची सारखीच पद्धत अवलंबली आहे. पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने या टोळ्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. तपासी अंमलदार पोहेकॉ विनोद भोई (अमळनेर) आणि पोना संदीप नन्नवरे (चोपडा ग्रामीण) हे करीत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news