भुसावळ ट्रामा सेंटर बनले चार्जिंग स्टेशन? कर्मचाऱ्यांच्या गैरवापरामुळे वाद

परिचारीकांच्या ई-वाहन चार्जिंगमुळे ट्रॉमा सेंटर चर्चेत
Trauma Care Center Bhusawal
ट्रॉमा केअर सेंटर भुसावळpudhari news network
Published on
Updated on

जळगाव : नरेंद्र पाटील

रुग्णांची सोय व्हावी त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागू नये म्हणून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय किंवा ट्रॉमा सेंटर बनवण्यात आले आहेत. अशाचप्रकारे भुसावळ शहरातील प्रमुख सेंटर मुख्य राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 56 च्या बाजूला ट्रॉमा सेंटर उभारण्यात आलेले आहे. रुग्णांचा हेळसांड होऊ नये याकरीता रुग्णालयात 24 तास वीजपुरवठा सुरु ठेवण्यात आलेला आहे. मात्र या सुविधेचा खुद्द कर्मचारी वर्गाकडूनच गैरवापर केल्याचे समोर येत आहे. कार्यालयातील परिचारीका आपले ई - वाहन ट्रामा सेंटरमध्ये आणून चार्जिंग करताना दिसून आहेत.

भुसावळ तालुका परिसरातील ट्रॉमा सेंटर हे उपचारार्थ रुग्णालयाबरोबरच इलेक्ट्रिक मोटरसायकल चार्जिंग स्टेशन म्हणून सेवेसाठी सज्ज झाले आहे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. या ठिकाणी कार्यरत असलेल्या परिचारीका इलेक्ट्रिक मोटरसायकल आपल्या कार्यालयीन वेळेत सेंटरमध्ये आणून चार्जिंग करून घेत आहेत. याबाबत व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित विभागाच्या वैद्यकीय अधिकारी यांनी येथील परिचारीकांना कारणे दावा नोटिसा बजावल्या आहेत.

रुग्णालयात रुग्णांसाठी 24 तास वीज पुरवठा सुरू असतो. त्यामुळे येथील स्टाफ आपल्या वाहनासाठी सरकारी विजेचा गैरवापर करत असल्याचा आरोप होत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रुग्णालयीन स्टाफ विजेचा वापर सर्रासपणे करत आहेत.

ट्रॉमा सेंटर व ग्रामीण रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर विजय कुरकुरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, संबंधित कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आलेली असून लेखी उत्तरही मागविण्यात आलेले आहे. खुलासा आल्यानंतर संबंधित बिलाची रक्कम वसूल करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर किरण पाटील यांना संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिलेला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news