

जळगाव, नरेन्द्र पाटील
खानदेशामध्ये महत्त्वाचा जिल्हा म्हणून जळगाव जिल्ह्याकडे पाहण्यात येते. हा जिल्हा खानदेशामध्ये धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांपेक्षा सर्वात मोठा जिल्हा आहे. या जिल्ह्यातील महसूल चे कामे व नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयात येणे अवजड होऊ नये म्हणून अप्पर जिल्हाधिकारी व अप्पर तहसील कार्यालय चे प्रस्ताव शासनाकडे गेल्या सहा महिन्यापासून पडून आहे. यामध्ये त्यांचा आकृतीबंध ही आहे मात्र भुसावळ जिल्हा निर्मितीच्या चर्चेला सध्याला मोठ्या प्रमाणात उधाण आलेले आहे. यामुळे शासन कोणत्या निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
खानदेशामधील जळगाव जिल्हा हा सर्वच दृष्टीने महत्त्वाचा व मोठा आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये अकरा तालुके आहेत व जळगाव येथे चाळीसगाव मुक्ताईनगर या भागातील नागरिकांना येण्या-जाणे फार कठीण होते. त्यांना जवळपास 100 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे नागरिकांची हेळसांड व नागरिकांचे कामे तत्पर व्हावी यासाठी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय व अप्पर तहसील कार्यालयाचा प्रस्ताव आकृतीबंधासह शासनाला 2024 सप्टेंबर महिन्यात पाठवण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे. मात्र अजूनही या प्रस्तावावर शासनाकडून कोणतीही प्रतिक्रिया किंवा कारवाई झालेली नाही.
असे असतानाच महायुतीच्या या नवीन सरकारमध्ये 26 जानेवारी रोजी भुसावळची जिल्हा निर्मिती म्हणून घोषणा होणार या चर्चेला व बातम्यांना सोशल मीडियावर उधाण आले आहे. यामुळे शासन जिल्हा निर्मितीकडे कल देणार की गेल्या सहा महिन्यापासून त्यांच्याकडे पडलेल्या प्रस्तावावर विचार करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय हे भुसावळ चाळीसगाव या ठिकाणी प्रस्तावित आहे. जळगाव येथे तर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय आहेत. त्यामुळे भविष्यात शासनाने अप्पर जिल्हाधिकारी मंजूर केल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय होतील..
यामध्ये भुसावळ अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत भुसावळ मुक्ताईनगर बोदवड रावेर यावल या तालुक्यांचे कामकाज चालतील
तर चाळीसगाव अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत पाचोरा भडगाव चाळीसगाव या तालुक्यांचे कामकाज चालेल
जळगाव या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये संपूर्ण जिल्हा ऐवजी जामनेर एरंडोल धरणगाव पारोळा अमळनेर चोपडा व जळगाव या तालुक्याचे कामकाज होणार आहे अशा प्रस्ताव शासनाकडे गेलेला आहे.
अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत गावठाण विस्तार योजना आरटीआय अपील जमिनीचे प्रकरणे ग्रामीण भूमिहीन जागावाटप तसेच 39 कामे या कार्यालयांतर्गत होणार आहे किंवा चालतील
यासाठी अप्पर जिल्हाधिकारी नायब तहसीलदार क्लर्क दोन अवर कारकून एक शिपाई येत असा आकृतीबंध पाठवण्याची माहिती समोर येत आहे.
अप्पर तहसील कार्यालय मेहुनबारे पहूर जळगाव या ठिकाणी प्रस्तावित आहे
या ठिकाणी अप्पर तहसीलदार एक तहसीलदार नायब तहसीलदार क्लर्क अवलकारकून शिपाई असा आकृतीबंध पाठवण्यात आलेला आहे
यामध्ये जमिनीचे वर्ग दोन वर्ग एक चे प्रकरणे आरटीआय अपील असे प्रकरणाचे कामकाज चालणार आहे
शासनाकडे गेल्या सहा महिन्यापूर्वी जर प्रस्ताव गेलेला आहे आकृतीबंध ही पाठवण्यात आलेला आहे मात्र त्यावर अजूनही कोणता निर्णय झालेला नाही तर दुसरीकडे येत्या 26 जानेवारी रोजी भुसावळ जिल्ह्याची निर्मिती होणार असल्याच्या चर्चेला मोठ्या प्रमाणात उधाण आलेले आहे व अशा बातम्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फिरू लागल्या आहेत तर दुसरीकडे याबाबत महसूल अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता त्यांनी असा कोणताही प्रस्ताव शासनाकडे पाठवल्या नसल्याच्या सांगितले.