Jalgaon Crime: भुसावळ येथून 23 ग्रॅम एमडी जप्त

MD drug seizure: तीन आरोपी अटक, पाच दिवसांची पोलीस कोठडी
MD drugs seized
एमडी ड्रग्जFile Photo
Published on
Updated on

Bhusawal drug racket exposed

जळगाव: भुसावळ शहरातून अटक केलेल्या आरोपीच्या घरातून 23 ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई जळगाव शहराचे डीवायएसपी संदीप गावित व त्यांच्या टीमने दि.3 रोजी सकाळी तीन वाजेपर्यंत केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने दिली.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील शाहूनगर मध्ये शहर पोलीस स्टेशनने टाकलेल्या धाडी मध्ये ड्रग्स जप्त करण्यात आले होते. यामधील मुख्य आरोपी सरफराज याला अटक केल्यानंतर त्याच्या चौकशी मध्ये याकुब याचे नाव समोर आले. त्यावर पाळत ठेवण्यात आल्यानंतर जळगाव येथे आल्यावर त्याला अटक करून चौकशी केली असता भुसावळ येथील अन्सार भिती, वसीम खान यांची नावे समोर आली.

MD drugs seized
Australia Election Result : ऐतिहासिक विजय! अल्बानीज सलग दुसर्‍यांदा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान

त्यांनी यामधील वसीम खान यांच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरातून 23 ग्रॅम एमडी ड्रग्स मिळून आले. ही कारवाई दोन मे च्या रात्री सुरू झाली असता तीन मे च्या सकाळी तीन वाजता संपली. या कारवाईमध्ये डीवायएसपी संदीप गावित, शहर पोलीस स्टेशनचे एपीआय नाईक, रीडर गायकवाड व इतर कर्मचार्‍यांसह फॉरेन्सिकची टीम घटनास्थळी उपस्थित होती.

तिन्ही आरोपींना आज दुपारी न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने दिली. यावरून पुन्हा जळगाव व भुसावळ शहरात एमडी ड्रग्स मोठ्या प्रमाणात आपले पाय फोफावत असल्याचे दिसून आलेले आहेत.

भुसावळ शहरामध्ये बाजारपेठ हद्दीमध्ये झालेल्या कारवाईतून बाजारपेठेमध्ये एमडी ड्रग्स यापूर्वीही पकडण्यात आलेले आहेत. असे असताना स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती नाही यावर आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news