

जळगांव : राज्यातच नव्हे तर शहरातही लालपरी ही रक्त धमनी म्हणून प्रवाशांना आपल्या निश्चित स्थानापर्यंत ने - आण करीत आहे. मात्र प्रवाशी जिथून बस मध्ये बसतात त्याच बसस्थानकात बसची चाके पाण्यात व गड्यात रुतू लागल्याचे चित्र आहे. याच बस स्थानकासाठी उपमुख्यमंत्री, नामदार व आमदार यांनी वेळोवेळी उच्चार करून घोषणा केली आहे की येथे, बस एअरपोर्ट होईल मात्र इथे बस एअरपोर्ट तर सोडा या ठिकाणी साधे सिमेंट काँक्रिटीकरण किंवा डांबरीकरण सुद्धा झाले नाही. उपमुख्यमंत्र्यांनी लोकसभा निवडणुकीत तर नामदार गिरीश महाजन यांनी नुकतेच बस एअरपोर्ट ची घोषणा केली होती मात्र ती फक्त घोषणाच राहिलेली दिसत आहे.
बस बाहेर पडत असताना अर्ध्यापेक्षा जास्त चाक या गड्यामध्ये रुतत आहे. यामुळे बस मधलं बसलेल्या प्रवाशांना झटके किंवा दणक्याचा त्रास सहन करत प्रवास करावा लागतो. गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाचे आगमन जोरात किंवा संत गतीने सुरूच आहे अशा परिस्थितीत बस स्थानक परिसरात पाणीच पाणी झाले आहे.
लोकसभेच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भुसावळ येथे आले असता आमदारांनी भुसावळ बस स्थानकासाठी निधीतून मागणी केली होती व त्यांनीही त्यासाठी होकार दिला होता तर काही दिवसांपूर्वी ना. गिरीश महाजन यांनी या ठिकाणी बस एअरपोर्ट होणार अशी घोषणा केली होती. मात्र बस एअरपोर्ट झाले ना प्रवाशांच्या त्रास कमी झाला ना बस यांना गड्यातून सुटका मिळाली. या तिन्हींचा संगम आजही भुसावळ बस स्थानकावर पाहावयास मिळत आहे.
भुसावळ बस स्थानकाबाबत विधानसभेतही प्रश्न उपस्थित झाले होते. यावेळी विधानसभेमध्ये सांगण्यात आले होते की भुसावळ बसस्थानकासाठी डांबरीकरण साठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे. माञ ते ही आज पर्यंत काम झालेले नाही.
याबाबत भुसावळ बस स्थानकाचे डेपो मॅनेजर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आम्ही वरिष्ठांकडे पाठपुरावा करीत आहे. मात्र बस स्थानकात पाणी साचू नये यासाठी मुरूम टाकलेला आहे. मात्र गेल्या तीन-चार दिवसांपासून पाणी थांबत नसल्यामुळे इतर भागात मुरूम टाकण्यास अडचणी निर्माण होत आहे.
आर. एस. शिवदे, बस स्थानक डेपो मॅनेजर, भुसावळ