Bhakti Kishordas | स्वामीनारायण मंदिराचे कोठारी शास्त्री भक्ती किशोरदास यांचे निधन

कथेच्या कार्यक्रमाला जात असताना हृदयविकाराचा झटका
Shastri Bhakti kishordasji passed away
शास्त्री भक्तीकिशोरदासजी यांचे हृदयविकाराने निधन.Pudhari Photo

जळगांव : जिल्ह्यातील सावदा शहरातील स्वामीनारायण मंदिराचे कोठारी शास्त्री भक्ती किशोर दास यांचे हृदयविकाराच्या झटक्याने (दि. 28) रोजी सकाळी भुसावळ येथील खाजगी रुग्णालयात निधन झाले. (Bhakti Kishordas passed away)

सावदा शहरातील स्वामीनारायण मंदिराचे कोठारी शास्त्री भक्ती किशोरदासजी (55) हे दि. 28 रोजी खाजगी वाहनाने एका कथेच्या कार्यक्रमाला जात असताना त्यांना त्रास जाणू लागल्याने भुसावळ येथील रिदम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांना हृदयविकाराचा झटका तीव्र आल्याने त्यांची प्राणज्योत मावळली.

भक्ती किशोरदासजी यांचा परिचय

भक्ती किशोरदासजी सावदा स्वामी नारायण मंदिराचे कोठारी व येथील स्वामीनारायण गुरुकुलचे उपाध्यक्ष होते. त्यांनी वेदांत व्याकरण या विषयात संस्कृत या विषयात डबल पीएचडी केली होती. ते भागवत कथाकारदेखील होते. त्यांनी सावदासह परिसरात द्वारका, हरिद्वार, काशी आदी विविध ठिकाणी मोठ्या कथेचे आयोजन केले होते. त्यांच्या कथेला हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित राहत. यांनी स्वामीनारायण संप्रदायाचे मोठे कार्य या भागात केले. हिंदू धर्माचा प्रचार तसेच सर्व-धर्माचे समरसतेमध्ये त्यांचा मोठा पुढाकार होता. त्यांना संस्था व स्तरावरील मोठ्या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले असून स्वामीनारायण संप्रदायाचे विविध गुजराती ग्रंथ मराठीत व हिंदीत अनुवादित केले होते.

संत परंपरेप्रमाणे अंत्यसंस्कार

त्यांचेवर गुजरात येथील स्वामीनारायण संप्रदायाचे वडतालधाम येथे शनिवार दि. 29 रोजी संत परंपरेप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या अकाली निधनानंतर सावदा व परिसर तसेच विविध ठिकाणी असलेले भक्त शोकसागरात बुडाले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news