

जळगाव : जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले बच्चू कडू यांनी नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी 14 हजार कोटी रुपये लागतात मग शेतकऱ्यांना फक्त दोन हजार कोटी रुपयेच का? शेतकरी मर्यादा याच्यासाठी पैसे नाही का?अशा प्रश्न बच्चू कडू यांनी उपस्थित केला . आमचे लक्ष्य गुलाबराव नाही आमचे लक्ष्य शेतकरी आहे. भाषणांत जे बोलले ते म्हणतात की पालकमंत्र्याच्या घरावर मोर्चा काढू असे म्हटल्यावर एवढे वाईट वाटण्याचे कारण काय. जर तुम्ही सर्वसामान्य जनतेमधून निवडून आलेला आहात तर सर्व सामान्य माणूस तुमच्याकडे येत आहे त्यांच्याकडे जेवणालाही जाऊ असे बच्चू कडू माध्यमांशी बोलताना म्हणाले.
आज शेतकऱ्यांना गरज आहे 50 टक्के धरून शेतकऱ्यांना नफा भाव देणार पंतप्रधानांनी सांगितले होते मात्र कुठे 15 टक्के धरून भाव मिळत मिळत नाही. मग त्यांच्याकडून आता काय अपेक्षा आहेत त्यांनी जाहीर केले पाहिजे जशी मनमोहन सिंग सरकारने 82हजार कोटीची कर्जमाफी केली होती तशी यांनी करायला पाहिजे देशातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी . नगरला शेतकऱ्याने आपले शेत पाहून आत्महत्या केली त्याची आत्महत्या कोणत्या वडिलांना हृदविकाराचा झटका आला जे शेतकऱ्यांना द्यायचे असेल ते द्या फक्त शेतकऱ्यांना वाईट बोलू नका. असे आवाहनही त्यांनी केले.
मुख्यमंत्री म्हणतात शेतकरी राजकारण करत आहे दुसरीकडे अजित दादा म्हणतात की पैशाचं सोंग करता येत नाही. तुम्ही शेतकऱ्यांना दिलासा देण्याची ताकद ठेवत नाही पैसे द्याल तेव्हा द्या परंतु आपले बोलणे तर चांगले ठेवा असा टोला यावेळी बच्चू कडू यांनी लगावला. आज शेतकऱ्याची अवस्था एकदम बिकट आहे अतिवृष्टीने एकीकडे मेला तर दुसरीकडे शेतकरी भावाने मेला आहे,कापसाचे काय भाव आहे आज कापसाला साडेसहा हजार रुपये भाव आहे . मग का बोलायला तुम्ही विदेशातून कापूस तुम्हाला लाज नाही वाटत का? असा प्रति प्रश्न त्यांनी सरकारला उपस्थित केला आहे. विदेशातून कापूस बोलविताना आपल्या शेतकऱ्यांवर काय परिणाम होईल हे पाहायचे नाही आणि तिकडे ट्रम्प च्या समोर शेपटी हलवायची आणि इकडे येऊन मेळावे घ्यायचे अशा प्रश्न बच्चू कडू यांनी उपस्थित केला.
उद्या गुलाबराव पाटलांनी सांगावे की कापसाला भाव भेटला नाही सोयाबीनला भाव भेटला नाही केळीला भाव भेटला नाही मग गुलाब लावून टाकावा का. आम्ही व्यक्तिशः कोणावर जात नाही काही तुमचा धंदा नाही परंतु तुम्ही एरंडोल या भागाचे आमदार होतात आता जिल्ह्याची राज्याचे कॅबिनेट मंत्री आहात आणि तुमच्याच मतदारसंघात जर पाणी येत नसेल हे तर बोलावे लागेल. आमचा तुमच्यावर वैयक्तिक राग नाहीये हे तुम्हाला हे तर सांगावे लागेल ना सगळे धरणे आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर झाले ना शेतकऱ्यांची जमीन त्यामध्ये गेली ना मग पिण्याचे पाणी गावात पहिले पैसे की शहरात पहिले पाहिजे असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.
शहरातील लोकांना 175 लिटर प्रमाणे पाणी मिळते तर गावातील लोकांना 45 लिटर प्रमाणे पाणी मिळते.तुम्ही ग्रामीण भागातून निवडून येत असून हा भेदभाव का असा प्रश्न व प्रतिसवाल त्यांनी उपस्थित केला. येवला ग्रामीण भागात पाणी जास्त लागते तर तुम्ही शहराला पाणी जास्त ते काय तुमची जावई लागतात प्रत्येक ठिकाणी भेदभाव केलेला आहे शहरातील लोकांना अडीच लाखाचे घर तर गावातील लोकांना सव्वा लाखाचे घर ही कुठल्या अवस्था आहे प्रत्येक ठिकाणी भेदभाव आहे. असा आरोपही बच्चू कडू यांनी केला.