जळगाव : नरेंद्र पाटील
जिल्ह्यात 11 विधानसभा मतदारसंघ असून, त्यामध्ये शिवसेना शिंदे गट-भाजपने वर्चस्व आहे. यात जळगाव शहर व भुसावळ विधानसभा क्षेत्र भाजपसाठी सुरक्षित आहे, तर एका मतदार संघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचा आमदार आहे. एकूणच जिल्ह्यात महायुतीचे वर्चस्व आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीचा एकही आमदार नाही.
राज्याच्या राजकारणात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष आणि इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. मंत्री गिरीश महाजन व माजी मंत्री एकनाथ खडसे हे दोन मातब्बर नेते जिल्ह्यात आपल्या वर्चस्वासाठी लढत आहेत. असे असले तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खडसे यांच्याबाबत गणेशोत्सवानंतर सकारात्मक निर्णय होणार असल्याचे सांगितल्याने ऐन निवडणुकीत खडसे भाजपमध्ये आल्यास जिल्ह्यात युतीचे पारडे जड होणार आहे.
गणपती विसर्जनानंतर एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश बनतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे तसे झाल्यास मुक्ताईनगर मतदार संघाचे चित्र बदलू शकते. तसेच अनेक मतकर संघांतील गणितेही बदलू शकतात. राष्ट्रचायी शरद पवार गटाच्या उमेदवार या खडसेंच्या पातीलच बाहीर झालेल्या आहेत. त्यामुळे जर खडसे भाजपमध्ये गेले, तर त्यांची मुलगी रोहिणी खडसे कुठे व कोणत्या पक्षात राहणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
शहर विधानसभा क्षेत्रात भाजपचे सुरेश भोळे गेल्या दीन टर्मपासून आमदार आहेत. पूर्वी माजी आमदार सुरेशदादा जैन यांचा हा बालेकिल्ला होता. युतीमध्ये फूट पडल्यानंतर येथे भाजपने वर्चस्व निर्माण केले आहे. येथे उद्धव ठाकरे गटातील अनेक इच्छुकांनी दंड थोपटले आहेत. भुसावळ शहर मतदार संघातही भाजपचे वर्चस्व आहे. या मतदार संघात दोन टर्मपासून भाजपचे संजय सावकारे निवडून आले आहेत. येथे महाविकास आघाडीकडे तुलनात्मकदृष्ट्या प्रतिस्पर्धी चेहरा नसल्याने भाजपसाठी हे क्षेत्र सुरक्षित मानले जात आहे.
जामनेर मतदारसंघ ज्येष्ठ मंत्री गिरीश महाजन यांचा बाल्लेकिल्ला आहे. महाजन येथून सहावेळा निवडून आले. यंदा मात्र मराठा आंदोलनामुळे महाजन यांची काळजी बाडली आहे. राष्ट्रवादीचे बडे प्रस्थ संजय गरुड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, मात्र, येथे माजी जि. प. अध्यक्ष दिलीप खाउपे यांना शरद पवार यांनी गळाला लावले आहे. मराठा आरक्षण चळवळीचे जरांगे-पाटील काय भूमिका घेतात, तसेच राष्ट्रवादी कोणाला उमेदवारी देणार, यावरच निवडनुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
चाळीसगाव हा आमदार मंगेश चव्हाण यांचा मतदारसंघ आहे. येथे उद्धव ठाकरे गटाकडून माजी खा. उमेश पाटील मैदानात उतरणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. जळगाव ग्रामीणमध्ये शिवसेना शिंदे गटाचे नेते पालकमंत्री गुलाबराव पाटील व राष्ट्रवादी कग्रिस शरद पवार गटाचे गुलाबराव देवकर यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे. पाचोरा भडगावमध्ये शिवसेना शिंदे गटाचे वर्चस्व आहे. येथे आमदार किशोर आप्पा पाटील आहेत. त्याचचरोबर भाजप तालुकाध्यक्ष अमोल शिंदे हेसुद्धा अपक्ष माणून रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. पारोळा एरंडोलमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील आणि माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांचा सामना पुन्हा रंगणार असे दिसत आहे.
भाजपचे माजी खा. ए. टी. पाटील हेदेखील तयारीला लागले आहेत. शिवाय ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष हर्षल माने हेही इच्छुक आहेत. चोपडपात शिवसेना शिंदे गटाच्या लत्ता सोनवणे व माजी आमदार चंद्रकांत पाटील किंला त्यांच्या घरातून इतर कोणी, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून माजी आ. दिलीप वाघ, डॉ. बारेला इच्छुक आहेत. अमळनेरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अनिल पाटील यांचा चांगला प्रभाव आहे, तर महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार मैदानात येणार यावर लढत स्पष्ट होणार आहे. विशेष मागचे माजी आमदार शिरीष चौधरी है अपक्ष म्हणून उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. साहेबराव पाटील, अनिल भाईदास पाटील यांच्या भूमिकादेखील महत्त्वाच्या ठरणार आहेत.
रावेर - यावलमध्ये काँग्रेसचे वर्चस्व आहे. येथे शिरीष चौधरी हे आमदार आहेत. दुसरीकडे प्रहार संघटनेचे उत्तर महमाई अध्यक्ष अनिल चौधरी हे देखील इच्छुक आहेत, तर भाजपकडूनच जिलाध्यक्ष अमोल जावळे, डॉ. कुंदन फेगडे व नंदकिशोर महाजन हे इच्छुक आहेत. मुक्ताईनगरमध्ये गेल्या निवडनुकीत भाजपचे खडसे यांचे तिकीट कापून त्यांच्या कन्या रोहिणी खडसे- खेचलकर यांनी उमेदवारी केली. दुसरीकडे अपक्ष उमेदचार व आमदार चंद्रकांत पाटील रिंगणात उतरले होते. त्यांना सहकार्य करण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादी यांनी छुपी हातमिळवणी केल्याची चर्चा होती. त्यामुळे अपक्ष उमेदवार व सध्या शिंदे गटात असलेले आमदार चंद्रकांत पाटील यांचा विजय झाला होता.