दहावीच्या निकालात पुन्हा 'लेकीं'चाच डंका; जळगाव जिल्ह्याचा निकाल ८५.२५ टक्के

Jalgaon SSC Result 2026| एरंडोल तालुक्याने मारली बाजी; तर पारोळ्याचा 'करेक्ट कार्यक्रम', १३ हजार विद्यार्थ्यांना 'डिस्टिंक्शन'
दहावीच्या निकालात पुन्हा 'लेकीं'चाच डंका; जळगाव जिल्ह्याचा निकाल ८५.२५ टक्के
Published on
Updated on

जळगाव : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. जळगाव जिल्ह्याने सरासरी ८५.२५ % यशाची नोंद केली आहे. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली असून मुलांच्या तुलनेत मुलींच्या यशाची टक्केवारी अधिक आहे. जिल्ह्यातून ५८ हजार ३९५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी ४९ हजार ५१४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

मुलींची बाजी; मुलांचा निकाल घसरला

यंदाच्या निकालातही मुलींनी आपली परंपरा कायम राखली आहे. जिल्ह्याचा एकूण निकाल ८५.२५\% लागला असला तरी, लिंगनिहाय टक्केवारीत मोठी तफावत दिसून येत आहे.

  • मुलींचा निकाल: ८९.३८\%

  • मुलांचा निकाल: ८२.५\% यावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की, अभ्यासात मुलीच 'अव्वल' आहेत.

तालुकानिहाय निकालाची स्थिती (टक्केवारीत)

जिल्ह्यात एरंडोल तालुक्याने ९३.९९\% गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला आहे, तर मुक्ताईनगर आणि भुसावळ तालुक्यांनीही ९० टक्क्यांचा टप्पा ओलांडला आहे. सर्वात कमी निकाल पारोळा तालुक्याचा लागला आहे.

तालुका निकाल (%)

  • एरंडोल : ९३.९९ %

  • मुक्ताईनगर : ९२.५७ %

  • भुसावळ : ९१.८८ %

  • पाचोरा : ८९.७३ %

  • जळगाव शहर (क्रॉप एरिया) : ८८.२३ %

  • भडगाव : ८७.०४ %

  • धरणगाव : ८५.८७ %

  • रावेर : ८४.२७ %

  • बोदवड : ८३.६२ %

  • चाळीसगाव : ८३.५९ %

  • चोपडा : ८३.१२ %

  • यावल : ८२.२१ %

  • जामनेर : ८०.३५ %

  • जळगाव (ग्रामीण) : ८०.२७ %

  • पारोळा : ७६.९२ %

गुणवत्तेचा पाऊस: १३ हजार विद्यार्थ्यांना 'विशेष प्राविण्य'

जिल्ह्यात उत्तीर्ण झालेल्या ४९ हजार ५१४ विद्यार्थ्यांपैकी अनेकांनी घवघवीत यश संपादन केले आहे. श्रेणीनिहाय निकाल खालीलप्रमाणे आहे:

  • विशेष प्राविण्य (Distinction): १३,३८९

  • प्रथम श्रेणी (First Class): १८,०७५

  • द्वितीय श्रेणी (Second Class): १४,०६८

  • उत्तीर्ण श्रेणी (Pass Class): ३,९८२

    परीक्षेची आकडेवारी एका नजरेत:

  • एकूण नोंदणीकृत परीक्षार्थी: ५८,३९५

  • प्रत्यक्षात परीक्षेला बसलेले: ५८,०७८

  • उत्तीर्ण विद्यार्थी: ४९,५१४ (मुले: २६,८७७, मुली: २२,६३७)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news