Jalgaon news: दारूच्या व्यसनाचा भयानक शेवट! कंटाळलेल्या आई, वडील अन् भावानेच घेतला तरुणाचा जीव

मोहाडीतील प्रकरणाचा १ महिन्यानंतर भयानक खुलासा झाला आहे. दारूच्या व्यसनामुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळून कुटुंबियांनीच तरूणाला संपविल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
crime news
crime newsFile Photo
Published on
Updated on

Jalgaon news

जळगाव : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहाडी येथे गत महिन्यात झालेल्या तरुणाच्या कथित आत्महत्येच्या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे. राधेशाम हरचंद राठोड (वय २६) याचा मृत्यू आत्महत्या नसून कुटुंबीयांनीच (आई, वडील व भाऊ) संगनमत करून त्याचा खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

३१ जुलै रोजी दुपारी दीडच्या सुमारास राधेशाम याने दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. त्यानुसार सुरुवातीला एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र, तपासादरम्यान पोलिसांना घटनेबाबत संशय निर्माण झाला. त्यानंतर करण्यात आलेल्या सखोल चौकशीत कथित आत्महत्येच्या घटनेमागील वेगळेच वास्तव समोर आल्याचा पोलिसांचा दावा आहे.

crime news
Jalgaon News: कंत्राटदाराची नफेखोरी निष्पापांच्या जीवावर बेतली; जळगाव बायपासवरील बळीनंतर ॲग्रो इन्फ्राच्या मालकावर गुन्हा

या प्रकरणी पोलिसांनी मृतकाची आई मीराबाई हरसिंग राठोड, वडील हरसिंग उर्फ हरचंद नथ्यु राठोड आणि भाऊ सचिन हरसिंग राठोड (सर्व रा. मोहाडी, ता. जि. जळगाव) या तिघांना अटक केली आहे. कुटुंबातील व्यक्तीच्या कथित आत्महत्येच्या प्रकरणात तपासाची दिशा बदलून खुनाचा गुन्हा उघडकीस आल्याने मोहाडी परिसरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.

पोलिसांच्या तपासानुसार, राधेशाम याला दारूचे व्यसन होते. तो दारूच्या नशेत घरी आल्यानंतर आई-वडील आणि भावासोबत वाद घालून त्यांना मारहाण करत असे. त्याच्या या त्रासाला कंटाळून आरोपींनी संगनमत केले. ३१ जुलै रोजी दुपारी त्यांनी राधेशामचा दोरीच्या साहाय्याने गळफास देऊन खून केला आणि त्यानंतर घटनेला आत्महत्येचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. तसेच ज्या दोरीचा वापर खुनासाठी करण्यात आला, ती जाळून पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

सुरुवातीला आत्महत्येचा प्रकार वाटत असतानाच पोलिसांनी बारकाईने तपास सुरू केला. चौकशी, उपलब्ध पुरावे आणि घटनाक्रमाच्या आधारे पोलिसांनी हा बनाव उघडकीस आणला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime news
Jalgaon News: अमळनेरमध्ये भेसळयुक्त दुधाचा 'सफेद धंदा' उघडकीस; पोलिसांची धडक कारवाई

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news