जळगाव : हतनूर 25 तर गिरणा मध्ये अवघा ११ टक्के पाणीसाठा

जळगाव जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठ्याची चिंताजनक स्थिती

Hatnoor Dam
हतनूर धरणfile photo
Published on
Updated on

जळगाव : जिल्ह्यातील चार महत्त्वाच्या प्रकल्पांमधील गिरणा, हतनूर, वाघूर, शेळगाव बॅरेज या धरणांपैकी गिरणा धरणामध्ये 11.19 टक्के तर हतनूर मध्ये 25.20 टक्के जलसाठा शिल्लक राहिलेला आहे. तर वाघूर मध्ये 54.20 तर शेळगाव बॅरेज मध्ये 35.34 टक्के पाणीसाठा आहे. हतनूरच्या पाणलोट क्षेत्रात 1357.4 मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे. मात्र पावसाळा सुरु होऊन पाहिजे तशी आवक अजूनही करण्यात आलेली नाही. गिरणा धरणातही तशीच परिस्थिती आहे.

जळगाव जिल्ह्यामध्ये मुख्य धरणे असून त्यामध्ये गिरणा, हातनूर, वाघूर, शेळगाव बॅरेज यांचा समावेश होतो. यामधून गिरणा व हतनूर धरणातून मोठ्या प्रमाणात सिंचन, औद्योगिक वसाहत व शेतीसाठी पाणीपुरवठा केला जात असतो. त्याच बरोबर पिण्याच्या पाण्याचाही पुरवठा हतनूरमधूनच होतो. वाघुर धरणातून जळगाव, जामनेर या भागातील गावांना पाणी पुरवठा होतो.

यंदा सात जून पासूनच पावसाचे वेध शेतकऱ्याला लागलेले असतांना यावेळी पावसाने फक्त शिडकाा करत हजेरी लावली. तर रोहिण्या व मृग ही पावसाचे नक्षत्र आता संपलेली असून अरगडा नक्षत्र सुरू झालेले आहे. या नक्षत्रात पावसाचा जोर विशेष असतो. शेतकऱ्याने पेरणी केलेली असून नुकत्याच आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचे संकट टळले आहे. मात्र वर्षभर पुरेल इतका मुबलक पाणीसाठा अजूनही हतनूर किंवा गिरणा धरणामध्ये जमा झालेला नाही.


Hatnoor Dam
Jalgaon Crime | गुरे चोरणाऱ्या टोळीच्या अखेर आवळल्या मुसक्या

हतनूर धरणाचा पाणीसाठा हा मुख्यतः त्याच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसावर अवलंबून असतो. यामध्ये आजपर्यंत बऱ्हाणपूर 190.4 मिलिमीटर, देडतलाई 152.4, हतनूर 171 मिलिमीटर पेक्षा मध्ये 111.6, एरंडी 177.6, गोपाल खेडा 184.4, चिखलदरा 29.4, लक पुरी 70.8, लोहतार 162, अकोला 98.8 याप्रमाणे १३५७.४ मिलिमीटर पाऊस झालेला आहे

गिरणा धरण

वॉटर लेव्हल. 285.020 मि

ग्रॉस स्टोरेज 147.682 मी मी

जिवंत साठा 62 782.मी

स्टोरेज 11.97 टक्के

आज पर्यंत पाऊस 117 मी

वाघूर धरण

वॉटर लेव्हल. 230.400 मी

ग्रॉस स्टोरेज 211.454मिमी

जिवंत साठा 134.715 मिमी

स्टोरेज 54.20 टक्के

आज पर्यंत पाऊस. 226 मी

शेळगाव बॅरेज

वॉटर लेव्हल. 172.05 मी

ग्रॉस स्टोरेज 116.366मिमी

जिवंत साठा 110.348मिमी

स्टोरेज 35.34 टक्के

आज पर्यंत पाऊस

धरणाचे दोन दरवाजे 0.3 मीटरने उघडण्यात आले असून 1150 मिमीने विसर्ग सुरु आहे

हतनूर धरण

वॉटर लेव्हल. 210 .020 मी

ग्रॉस स्टोरेज 196.80 मिमी

जिवंत साठा 63.80 मिमी

स्टोरेज 25.20 टक्के

आज पर्यंत पाऊस 1357.4 मिमी झाला आहे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news