Agroworld Agricultural Exhibition : जळगावात आजपासून अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

मका हार्वेस्टर, हाय व्हील्स ठरणार आकर्षण
जळगाव
एम. जे. कॉलेज येथे चार दिवसीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.Pudhari News Network
Published on
Updated on

जळगाव : अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे शहरातील एकलव्य क्रीडा संकुलच्या एम. जे. कॉलेज येथे शुक्रवारपासून (दि. २१) चार दिवसीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते शुक्रवारी दुपारी 12 वाजता होणार आहे.

प्लॅन्टो कृषीतंत्रचे स्वप्नील चौधरी, जिल्हा परिषदेचे सदस्य प्रताप पाटील, सातपुडा ऑटोमोबाईलचे संचालक डी. डी. बच्छाव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. कृषी यंत्र व अवजारांच्या 45 स्टॉलसह प्रदर्शनात 210 हून अधिक स्टॉल्स असून तंत्रज्ञानावर आधारीत या कृषी प्रदर्शनाचा शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अ‍ॅग्रोवर्ल्डचे संचालक शैलेंद्र चव्हाण यांनी केले आहे. ॲग्रोवर्ल्ड प्रदर्शनात असलेले मका हार्वेस्टर मशीन एका दिवसात 8-10 एकर मका हार्वेस्ट करते. प्रदर्शनात कृषी यंत्र व औजारांचे तब्बल 45 स्टॉल्स आहेत. फवारणीसाठीचे ड्रोन, बदलते हवामान, मजूर टंचाई, अद्ययावत तंत्रज्ञान, करार शेती, कमी पाण्यात येणारी पिके अशा शेतकर्‍यांची मागणी व गरजेवर आधारित मांडणीसह २१० स्टॉल्स हे या प्रदर्शनाचे आकर्षण ठरणार आहे. अ‍ॅग्रोवर्ल्डचे जळगावतील यंदाचे हे ११ वे प्रदर्शन आहे.

जळगाव
Jamner Municipal Election | जळगाव जिल्ह्यात भाजपने नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत खाते उघडले; जामनेरमध्ये साधना महाजन यांची बिनविरोध निवड

निर्मलतर्फे मोफत बियाणे

निर्मल सिडसतर्फे पहिल्याच दिवशी पहिल्या पाच हजार जणांना कीचन गार्डन बियाणे पाकीट मोफत वितरित केले जाणार आहे. याव्यतिरिक्त रोज १०० पेक्षाही अधिक जणांना लकी ड्रॉद्वारे आकर्षक बक्षीसांसह सिका ई- मोटर्सतर्फे ई-स्कूटरचे बंपर बक्षीस जिंकण्याची संधी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news