जळगाव : जिल्ह्यातून चार सराईत गुन्हेगारांना हद्दपारचे आदेश

जळगाव : जिल्ह्यातून चार सराईत गुन्हेगारांना हद्दपारचे आदेश

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पहुर व जामनेर येथील टोळीने गुन्हे करणाऱ्या चार गुन्हेगारांमुळे जिल्ह्यांतील सार्वजनीक शांतता सुव्यवस्था अबाधीत टेवण्यावावत त्यांचे विरुध्द वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करुन सुध्दा त्यांचे वर्तनात सुधारणा झालेली नाही. त्यांचे विरुध्द गुन्हे दाखल आहे. त्याच्या विरुद्ध हद्दपरीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांकडे ठेवण्यात आला होता. चौघांमुळे जनतेच्या जिवीताला, मालमत्तेस मोठा धोका निर्माण झालेला आहे असे चौकशीत निष्पन्न झालेले. या चारही जणांना जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

प्रदीप रायदास पाटील (वय २४ रा पहूर पेठ ता जामनेर टोळी प्रमुख), ,शहारुख बनेखा तडवी (वय २३ रा शिवनगर पहुर पेठ तत्र जामनेर), इरफान लालखों तडवी (वय २३ रा शिवनगर पहुर पेठ ता जामनेर), शेख राज शेख समद (वय २४ रा ख्वॉजा नगर पहुर पेठ ता जामनेर), यांच्याविरुध्द जळगाव जिल्ह्यातील पहुर पोलीस स्टेशनमध्ये जबरी चोरी, चोरी असे एकुण पाच गुन्हे दाखल आहेत.

यांच्याविरोधातील हद्दपार प्रस्ताव हा पहुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सानप, सफो रविन्द्र देशमुख, पोहेकों जिजाबराव कोकणे, पोना ज्ञानेश्वर ढाकरे, पोकों विकास गायकवाड, पोका गोपाळ गायकवाड, अशांनी सदरचा प्रस्ताव तयार करुन पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी जळगाव यांच्याकडे सादर करण्सयात आला.

हद्दपार प्रस्तावाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी, पाचोरा धनंजय येरुळे यांनी केली. ही टोळीने जळगाव जिल्ह्यातील पहुर पोलीस स्टेशन परीसरात ठिक ठिकाणी दहशत पसरवितात. टोळीची नागरिकांमध्ये भिती निर्माण होऊन नागरिकांचे जिवीतास व जंगम मालमत्तेस धोका निर्माण झालेला आहे. त्यांना जळगाव जिल्हयांतील सार्वजनीक शांतता सुव्यवस्था अबाधीत ठेवण्याबाबत त्यांचे विरुध्द वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करुन सुध्दा त्यांचे वर्तनात सुधारणा झालेली नाही. त्यांचे विरुध्द गुन्हे दाखल असुन त्यांच्यामुळे जनतेच्या जिवीताला, मालमत्तेस मोठा धोका निर्माण झालेला आहे असे चौकशीत निष्पन्न झालेले आहे.

पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेडडी, यांनी प्रस्तावाचे चौकशीअंती चारही आरोपींना एक वर्षाकरीता जळगाव जिल्ह्यांच्या हद्दीतून हद्दपार आदेश पारित केलेले आहे. सदर हद्दपार प्रस्तावाचे कामकाज पो. निरी. किसन नजनपाटील, स्थानिक गुन्हे शाखा जळगाव पोलीस अंमलदार सफी युनूस शेख इब्राहिम, पोहेकॉ सुनिल पंडीत दामोदरे यांनी पाहिले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news