जळगाव : भुसावळमध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या दाम्पत्यांवर कारवाई

जळगाव : भुसावळमध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या दाम्पत्यांवर कारवाई

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : भुसावळ शहरातील महेश नगर येथे मसाज पार्लरच्या नावाखाली एक दाम्पत्य कुंटणखाना चालवीत होते. डीवायएसपी कृष्णांत पिंगळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मारलेल्या छाप्यात सहा महिलांची सुटका करण्यात आली. बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महेश नगर येथे एक दाम्पत्य बॉडी मसाज केंद्राच्या नावाखाली कुंटणखाना सुरु असल्याची माहिती डी वाय एस पी कृष्णांत पिंगळे यांना मिळाली.  या सर्व प्रकारावर पोलीस पाळत ठेवून होते. आज (दि. 3) महेश नगर भागात असलेल्या 'माइंड अॅण्ड बॉडी स्क्रीन केअर स्पा'वर या बॉडी मसाज केंद्रावर पोलिसांनी छापा टाकला. पती विशाल शांताराम ब-हाटे व त्याची पत्नी पल्लवी विशाल ब-हाटे हे दाम्पत्य हे मसाज पार्लर चालवित होते. स्वतःच्या घरात आर्थिक फायद्याकरिता महिलांना पैशाचे अमिष देवुन हा कुंटणखाना सुरु ठेवलेला होता. पाच महिलांची यातून सुटका करण्यात आली आहे. अशा प्रकारचे अनैतिक व्यापार व असमाजीक कृत्य करणारया विरुध्द बाजारपेठ पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती

उप विभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे, सपोनि रुपाली चव्हाण, सपोनि सुदर्शन वाघमारे, मसफौ शालीनी वलके, सफौ प्रदिप अभिमन्यु पाटील, मपोहेकों अश्विनी जोगी, पोहेकों अनिल गणपत झुंझारराव या पथकाने ही कारवाई केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news