जळगाव: भरदिवसा १ लाख २१ हजारांची रोकड लांबविली | पुढारी

जळगाव: भरदिवसा १ लाख २१ हजारांची रोकड लांबविली

जळगाव: पुढारी वृत्तसेवा : स्टेशन रोडवरील राष्ट्रीय महाविद्यालयाजवळ दोन जणांचे लक्ष विचलित करून १ लाख २१ हजारांची रोकड लांबविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी  अज्ञात चोरट्यांविरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील बहाळ येथील शेतकरी भगवान काशीनाथ मोरे हे वास्तव्याला आहेत. शनिवारी भगवान मोरे हे कामानिमित्त चाळीसगाव शहरात आले होते. दुपारी अडीचच्या सुमारास चाळीसगाव स्टेशन रेाडवरील राष्ट्रीय महाविद्यालयाजवळ त्यांच्याजवळ कपडी पिशवीत ठेवलेले ८० हजारांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लांबविली.

त्याचवेळी त्याच परिसरात शेनफडू आनंदा बागुल (रा. चाळीसगाव) यांच्याजवळील ४१ हजार रूपयांची रोकड देखील लांबविली. एकच वेळी दोन घटनेत एकूण १ लाख २१ हजार रूपये चोरून नेले. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रशांत पाटील हे करीत आहे.

हेही वाचा 

Back to top button