जळगाव: सुसरी येथे भरदिवसा ३ लाखांची घरफोडी    | पुढारी

जळगाव: सुसरी येथे भरदिवसा ३ लाखांची घरफोडी   

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : भुसावळ तालुक्यातील सुसरी येथे बनावट चावीच्या मदतीने वृध्दाचे बंद घरातून ३ लाख १० हजार रूपयांची रोकड चोरून नेली. याप्रकरणी शनीवारी रात्री वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरणगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील सुसरी गावात शेतकरी दिलीप पंडीत पाटील हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शनिवारी (दि. २) त्यांचे घर बंद होते. अज्ञात चोरट्यांनी घर बंद असल्याचा फायदा घेवून बंद घराचे कूलूप बनावट चावीने उघडून कपाटात ठेवलेले ३ लाख १० हजारांची रोकड चोरून नेली.

या प्रकरणी दिलीप पाटील यांनी वरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून रात्री अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार श्रावण जवरे करीत आहे.

हेही वाचा 

Back to top button