जळगाव: व्हिडिओ व्हायरलची धमकी देऊन महिलेवर अत्याचार; आरोपीला अटक | पुढारी

जळगाव: व्हिडिओ व्हायरलची धमकी देऊन महिलेवर अत्याचार; आरोपीला अटक

जळगाव: पुढारी वृत्तसेवा : महिलेशी ओळख निर्माण करून व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केला. महिलेने कागदावर स्वाक्षरीसह दागिने देण्यास नकार दिल्याने महिलेला जीवेठार मारण्याची धमकी दिली.. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आलेली आहे.

शहरातील एका परिसरात महिला वास्तव्यास असून त्यांची भुषण निलेश पाटील (रा. खेडी, ता. जळगाव) याच्यासोबत ओळख निर्माण झाली. भूषण पाटील याने महिलेशी जवळीक साधून तिच्यावर शहरातील दोन वेगवेगळ्या हॉटेलमध्ये अत्याचार केला. त्या अत्याचाराचा व्हिडिओ तयार करुन तो व्हायरल करण्याची धमकी देत भूषण पाटील याने महिलेेकडून सुमारे तीन ते चार लाखांचे दागिने घेतले. महिलेला कोऱ्या कागदावर स्वाक्षरी करण्यास नकार दिल्याने भूषण पाटील याने त्यांना मारहाण करुन जीवेठार मारण्याची धमकी दिली.

 या प्रकरणी महिलेने एमआयडीसी पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार भूषण निलेश पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमारे करीत आहे.

हेही वाचा 

Back to top button