जळगाव : महापालिकेच्या अभियंत्याला मारहाण केल्याचा अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडून निषेध

जळगाव : महापालिकेच्या अभियंत्याला मारहाण केल्याचा अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडून निषेध

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : बांधकाम विभागाच्या कार्यालयात महापालिकेचे अभियंता प्रसाद पुराणिक यांना मारहाण केल्याची घटना घडली होती. या घटनेच्या निषेधार्थ आणि मारहाण करणाऱ्याला अटक करावी या मागणीसाठी महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा पोलीस अधीक्षक एमसीव्ही महेश्वर रेड्डी यांना सोमवारी (दि. ५) निवेदन देण्यात आले.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव महानगरपालिकेच्या काव्यरत्नावली चौकातील बांधकाम विभागात प्रसाद पुराणिक हे कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरीला आहे. २ फेब्रुवारी रोजी कनिष्ठ अभियंता प्रसाद पुराणिक हे ऑनड्युटी हजर असताना, सार्वजनिक बांधकाम युनिट कार्यालयात भूपेंद्र कुलकर्णी या व्यक्तीने शासकीय कामात अडथळा निर्माण करून अभियंता प्रसाद पुराणिक यांना शिवीगाळ करत थेट कानशिलात लगावली होती. या घटनेबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु अद्यापपर्यंत मारहाण करणाऱ्या भूपेंद्र कुलकर्णी याला अटक करण्यात आलेली नाही, जोपर्यंत अटक होणार नाही तोपर्यंत महानगरपालिकेतील कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी घेतला आहे. या अनुषंगाने सोमवारी (दि. ५) मारहाण केल्याच्या निषेधार्थ कामकाज बंद ठेवत विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा पोलीस अधीक्षक एमसीव्ही महेश्वर रेड्डी यांना मागण्याचे देण्यात आले आहे.

या निवेदनावर चंद्रकांत सोनगिरे, प्रसाद पुराणिक, संजय नेमाडे, प्रकाश पाटील, शामकांत बंगाळे, अमित बोरोले, जितेंद्र रंधे, प्रकाश पाटील, नितीन माळी, कैलास चौधरी, रवींद्र मुळे, उदय पाटील, जितेंद्र किरंगे, रमेश कांबळे, नागेश लोखंडे, उल्हास इंगळे यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news