‘ २०२४ मध्ये भाजपचा मुख्यमंत्री, तर राष्ट्रवादी आणि शिवसेना गट…’ बावनकुळेंनी जळगावात दिले राजकीय संकेत | पुढारी

' २०२४ मध्ये भाजपचा मुख्यमंत्री, तर राष्ट्रवादी आणि शिवसेना गट...' बावनकुळेंनी जळगावात दिले राजकीय संकेत

जळगांव; पुढारी वृत्तसेवा : 2024 च्या मे महिन्याच्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथ घेतील, यामध्ये 48 पैकी 45 खासदार हे त्यांचे समर्थन करण्यासाठी उभे राहतील. यासाठी जळगावच्या सर्वात जास्त मतांनी त्यांना विजयी करायचे आहे. तर ऑक्टोबर 2024 च्या विधानसभा होतील 30 नोव्हेंबरला वानखेडे स्टेडियमवर भाजपचे मुख्यमंत्री राहतील यावेळी देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता त्यांनी संकेत दिले. तर राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना शिंदे गटाच्या मतदार संघ अमळनेर ग्रामीण मतदार व जळगांव संघाच्या आमदारांसह गिरीश महाजन शपथविधी घेतील असे जाहीर केले, तर विद्यमान आमदार राजू मामा भोळे यांनी चिंता करू नये. ते भाजपचे पुढील उमेदवार असतील याचे असे संकेत देत ते 2024 संकल्प घेऊन भाजप वॉरियर सोबत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी चर्चा केली.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे हे 2024 लोकसभा व विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जळगाव लोकसभा वारियर सोबत वाचनालय येथे सायंकाळी चर्चा केली यावेळी बोलताना ते म्हणाले की, तुमच्याकडून एक संकल्प करून घेण्यासाठी येथे आलोय तीन तास 13 महिन्यांसाठी मागण्यासाठी आलेलो आहे या तीन तासांमध्ये प्रत्येक वारियरने आपल्या ग्रुप वर काम करायचा आहे वॉरिअरने आपला बूथ वर व्हाट्सअप च्या माध्यमातून सर्वांशी चर्चा करायचे व तसेच काहीतरी गडबड तर करीत नाहीये यासाठी एक तास द्यायचं कारण बिफफेक येत्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात वापर होणार आहेत त्याचा अनुभव मला या आल्याचं प्रदेशध्यक्ष बावनकुळे यावेळी म्हणाले माझा परिवार गायब करून त्या ठिकाणी वेगळे चित्र टाकण्यात आले सोशल मीडियावर काही टाकून आपल्या मतदारांना मतपरिवर्तन तर करणार नाही यासाठी हे होऊ नये म्हणून महाविजयायचे ग्रुप तयार करावे असे त्यांनी सांगितले.

महाविजयांचा संकल्प करून गुजरात मध्ये 35 वर्षापासून भाजपाचे सरकार आहे उत्तर प्रदेशात दोन वेळा बुलडोजर आलेले आहेत मध्यप्रदेश सातवेळा, राजस्थान मध्ये पाचव्यांदा तर या पुस्तकाप्रमाणे जर वॉरियर्स ने काम केले आणि पंधरा वर्षा भाजपाचे मुख्यमंत्री आल्याशिवाय राहणार नाही.असे म्हणाले

ज्या वॉरिअरच्या बुथवर 51% पेक्षा कमी मतदान पडेल त्यावरचं नाव थेट कमी होणार आहेत व त्याला कोणत्याच निवडणुकीमध्ये एबी फॉर्म मिळणार नाही असेही त्यांनी स्पष्ट संकेत दिले.

2024 ते 2019 हा पाच वर्षाचा काळ अमृत काळ असेल या काळात केलेली कामे 2017 काळ म्हणून पहावे पहावे जगाला पुरवठा करणारा देश म्हणून भारत देश पुढे येईल आत्मनिर्भर करण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला ते त्यांनी सांगितले. आज (दि. २९) बाहेर देशातून गॅस मागवित असल्याने त्याचे भाव कमी करता येत नाही. मात्र भविष्यात हायड्रोजन गॅस 120 रुपयात मिळणार असल्याचे संकेत त्यांनी सांगितले.

2024 च्या मे मध्ये नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतील त्यावेळेस महाराष्ट्रातील 48 पैकी 45 खासदार समर्थन करण्यासाठी उभे राहतील व ते सर्वाधिक मतांनी निवडून आलेले असतील तर यावेळी विधानसभेसाठी जळगाव शहराचे विद्यमान आमदार राजू मामा भोळे यांनी चिंता करू नका तुमची तिसरी टर्म राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वॉरियर म्हणून ज्यांची निवड झालेली आहेत ते 2024 मधील भाजपा मनपा नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती यामध्ये 51 टक्के मते घेऊन आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न करायचे आहे व बुथवर मेहनत घ्यायची आहे कारण ते भविष्यातील नेते असतील आपल्याला जळगाव मधून महाविजय खासदार आमदार व सर्व नगरपालिका महानगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद चे सदस्य पाहिजेत असे त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.

Back to top button