जळगाव : नवीन कायदे केल्यानंतर शेतकऱ्यांनी शेती कशी करावी? रघुनाथ पाटील यांचा सवाल | पुढारी

जळगाव : नवीन कायदे केल्यानंतर शेतकऱ्यांनी शेती कशी करावी? रघुनाथ पाटील यांचा सवाल

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : नवीन कायदे करीत असताना बी बियाणे कुठे मिळेल? फक्त राज्य शासन कायदे घेऊन येत आहे. तर शेतकऱ्यांनी शेती कशी करावी? बी बियाणे कंपन्यांसाठी केंद्राने तयार केलेले कायदे सक्षम असताना महाराष्ट्र राज्य काही नवीन कायदे हिवाळी अधिवेशनात पारित करण्याचा घाट घातलेला असताना त्याला विरोध म्हणून शेतकरी संघटना संपूर्ण महाराष्ट्र फिरून जनजागृती करीत आहे, शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथ पाटील म्हणाले आहेत. रघुनाथ पाटील यांनी जळगाव येथे पत्रकारांशी संवाद  साधला. यावेळी ते बोलत होते.

रघुनाथ पाटील म्हणाले,  देशात बी बियाणे विक्री त्यांना व कंपन्यांसाठी केंद्राने तयार केलेले कायदे पाण्यात येतात व त्या कायद्यांच्या मार्फत कारवाई करण्यात येत असते . येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने नवीन कायदे करण्याचा घाट घातलेला आहे. यामध्ये बी बियाणे विक्रेते व कंपन्या यांना गुंडांच्या रांगेत आणण्यात येत आहे. त्यांना टाडा किंवा एम पी डी ए कायद्या वापर करणार असाल त्यांना मोका लावणारच असाल तर कोणीच काम करणार नाही.

Back to top button