

जळगाव : पुढारी वृत्तसेवा : येथील राजमल लाखीचंद ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर एल गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड व मनराज ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि इतरांच्या बँक फसवणूक प्रकरणात ईडीकडून ३१५ कोटींच्या ७० स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. याबाबतची माहिती ईडीने आपल्या ट्वीटरवरून दिली आहे. (Rajmal Lakhichand)
सीबीआयने काही महिन्यापूर्वी गुन्हे दाखल केले होते. त्या आधारावर ईडीकडून मनी लाँड्रिंग प्रकरणी तपास सुरू होता. या तपासात मनी लाँड्रिंग झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ही जप्तीची कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ईडीने जळगाव, मुंबई, ठाणे, सिल्लोड आणि कच्छमधील 70 स्थावर मालमत्ता आणि जंगम मालमत्ता तात्पुरत्या स्वरुपात जप्त केल्या आहेत. 13 ऑक्टोबर 2023 रोजी पीएमएलए, 2002 अंतर्गत ही कारवाई करण्यात आलेली आहे. (Rajmal Lakhichand)
राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, आरएल गोल्ड व मनराज ज्वेलर्स आणि त्यांचे प्रवर्तक ईश्वरलाल शंकरलाल जैन लालवानी, मनीष ईश्वरलाल जैन लालवानी आणि आहे. इतरांनी मिळविलेल्या बेनामी मालमत्तांचा समावेश आहे.
हेही वाचा